
बल्लारपूर : बिहार राज्यातील बुद्ध गया येथील महाबोधी महाविहाराच्या बी टी ॲक्ट १९४९ नूसार प्रबंधन समितीत असलेल्या गैर बौद्ध हिंदू सदस्यांना समिती मधून बर्खास्त करून ते पूर्णपणे बौद्धांच्या प्रबंधनात देण्यात यावे, यासाठी जुनी नगर परिषद, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल इत्यादी संघटनेच्या वतीने नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले होते.
धरणे आंदोलनाची सुरूवात प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले. पुतळ्याजवळ महाबोधी महाविहार हिंदूमुक्त करण्यात यावे अशा घोषणा देण्यात आल्या.
डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करून आंदोलन स्थळी सर्व आंदोलक एकत्र येऊन सभेत रूपांतर करण्यात आले. सभामंडपात पूज्य भदंत धम्मघोष मेत्ता, भदंत सुचित्त बोधी, डॉ. सोमाजी गोंडाने, जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, कविता गौरकार जिल्हा महिला अध्यक्षा, जयदीप खोब्रागडे, कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, गायत्री रामटेके, अजय चव्हाण, पवन भगत, ॲड. शीतल हस्ते, ॲड. प्रियंका चव्हाण, भास्कर भगत आदी प्रमुख नेत्यांनी जनतेला या आंदोलनाची कारणे व पार्श्वभूमी बाबत मार्गदर्शन केले. या संपूर्ण धरणे आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष उमेश कडू यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता साव यांनी केले.
सदर धरणे आंदोलनाला आंबेडकरी यूथ बल्लारपूर, भिम आर्मी बल्लारपूर, लोक कल्याणकारी संघर्ष समिती बल्लारपूर, संकल्प प्रतिष्ठान बल्लारपूर, बुद्ध पौर्णिमा समारोह समिती पेपर मिल बल्लारपर सह इत्यादी संघटनांनी जाहीर समर्थन दिले होते..
Discussion about this post