
डोणगाव..
डोणगाव येथील सर्व्ह न 123 मधील बाजारात मध्ये दि. 10 मार्च ला सकाळी 2ते 3च्या दरम्यान आग लागून यामध्ये 9 दुकाने जळून खाक झाली व यामध्ये अंदाजे 21 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. थोडक्यात हकीकत अशी की डोणगाव येथील आठवडी बाजारात 10 मार्च च्या सकाळी 3वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली सदर आगीची माहिती मिळताच सदर भाजी व्यापारी हजर झाले व त्यांनी पोलीसांना कळताच पो. कॉ. पवन गाभणे हर्ष सहगल पोहेका मंगेश खडसे ज्ञानेश्वर घायाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. व सुनील आखाडे यांचे टॅकर बोलावून आग आटोक्यात आणली. याची माहिती महसूल विभाग यांना मिळताच महसुल चे तहसीलदार निलेश मडके तसेच तलाठी अमोल राठोड अनुप नरोटे पल्लवी सह महसूल चे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख निंबाजी पांडव तसेच जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी हे ही उपस्थित होते. यामध्ये आठवडी बाजारात असणारे शेख शौकत शेख सोनाजी बागवान यांचे 75 हजाराचे साहीत्य तसेच शकील शहा महेबुब शहा यांचे एक लाख तसेच शेख ईसाक शेख युसुफ अतार सहा लाख पंधरा हजार रुपये तसेच शांताबाई पांडव व गजानन गाभणे यांचे एक लाख दहा हजार रुपये व विनोद अशोक वाघमारे दोन लाख साठ हजार रुपये व गणेश अशोक वाघमारे तिन लाख साठ हजार रुपये तर शेख तौफीक शेख रहीम एक लाख पन्नास हजार रुपये लक्ष्मण दत्तात्रय महापुरे तिन लाख पन्नास हजार रुपये शेख इब्राहिम शेख संदलजी बागवान यांचे एक लाख रुपये असे एकूण विस लाख एकविस हजार रुपये चे नुकसान झाले असून सदर नुकसान ग्रस्त यांना त्वरीत मुख्यमंत्री सहायत्ता निधी मधून मदत द्यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी केली आहे. माजी आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी दुपारी भेट देऊन सर्व नुकसान ग्रस्त व्यापारी यांना प्रत्येकी 10. हजार रुपये ताबडतोब स्वत मदत दिली..
Discussion about this post