
जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे..
मुंबई दि. 10 – महायुती सरकार चे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याचा सादर केलेला अर्थसंकल्प हा सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प आहे. महायुती सरकार च्या या पहिल्या सर्वसमावेशक आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्णतेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल घडविणाऱ्या या अर्थसंकल्पाचे आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वागत करीत आहोत.अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला 2,923 कोटी अनुसुचित जाती विशेष घटक विकास योजनेसाठी 22,568 कोटी भरीव तरतुद करणारा हा अर्थसंकल्प आहे. अनुसुचित जाती विशेष घटक विकास योजनेसाठी 42 टक्के निधीची वाढ करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना 33 हजार 232 कोटी रुपये निधीचे वाटप, सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाचे आपण स्वागत करतो. महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पात दलित, आदिवासी, ओबीसी, महिला आणि शेतकरी सर्व घटकांना न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात विकसीत भारत घडविण्याच्या उद्दिष्टाकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल घडविणारा अर्थसंकल्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या सर्वांचे महाराष्ट्राचा उत्कृष्ट बजेट दिल्याबद्दल आपण त्यांचे स्वागत करीत आहोत. असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कळविले आहे..
Discussion about this post