

रायगड जिल्ह्यातून एकूण सोळा संघ खेळविण्यात आले आहे. त्याची प्रवेश फी 3500रू. आकारण्यात आली आहे. येथील टूर्नामेंटसाठी रायगड जिल्ह्यातून हजारो पब्लिक टूर्नामेंट पाहण्यासाठी आली होती. टूर्नामेंटमध्ये अनेक फलंदाजांनी चौकार, षटकारांची अतिशबाजी केली. अनेक गोलंदाजानी विकेट वार विकेट घेण्याची कमाल सुद्धा केली. अनेक क्षेत्ररक्षकांनी डाईज मारून कॅचेस घेतल्या असुन, चौकार, षटकार अडविले आहेत. आदिवासी प्रतिष्ठान महाराष्ट्र – कळंब, सुधागड, रायगड आयोजित चषक 2025 यांच्यातर्फे खुप छान आयोजन केलेले आहे. प्रथम विजेता संघ बी.सी.सी.परळी यांस प्रथम पारितोषिक 33,333रू. मा.श्री.सुरेश ठकोरे साहेब (मुंबई हायकोर्ट) यांस कडून आणि विलास पालवे यांस कडुन आकर्षक चषक देण्यात आले आहे. द्वितीय विजेता संघ काळकाई संघ रोहा यांस द्वितीय पारितोषिक 22,222रू. राकेश मानकर व मंगेश तळेकर यांसकडून विलास पालवे यांस कडून आकर्षक चषक देण्यात आले आहे.

👉 प्रथम विजेता..

👉 द्वितीय विजेता..

👉 तृतीय विजेता..
मॅन ऑफ दी सिरीज पुरस्कार बी.सी.सी. परळी संघाचा राकेश आवास्कर याला विलास पालवे यांसकडुन चषक व ब्रँडेड पुमा शूज रोशन वालगुडे यांसकडून देण्यात आले आहे. बेस्ट बॅट्समन पुरस्कार किरण आवास्कर किरण आवास्कर यांस देण्यात आले आहे. बेस्ट बॉलर पुरस्कार काळकाई रोहा संघाचा रोशन यांस देण्यात आले आहे. आदिवासी प्रतिष्ठान(महाराष्ट्र-राज्य)कळंब चषक 2025 आयोजित भव्य क्रिकेटचे सामने वर्ष 2रे सालाबाद प्रमाणे दि.8 मार्च आणि 9मार्च 2025 रोजी ठिकाण- सोमजाई क्रिडांगण धोंडीवली, पाली-खोपोली रोड ता.सुधागड, जि.रायगड, महाराष्ट्र, येथे भरविण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक- 33,333रू. आणि द्वितीय पारितोषिक- 22,222रू. असे आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालकावीर अशाप्रकारची बक्षीस ठेवण्यात आली आहे. दी. 8/3/2025 रोजी स्पर्धेचे उदघाटण वेळी मा.श्री.विजय तोंडे परमिलिटरी फोर्स ब्लॅक कमांडो श्रीनगर मधून सेवा निवृत्त, सचिव- आजी माजी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान सुधागड, मा.ह.भ.प. श्री.वासुदेव दत्तात्रेय चोरघे (तोरणपाडा) इंडियन आर्मी (मराठा बटालियन) मधून 19 वर्ष सेवा करत जम्मू आणि काश्मीर एल.ओ.सी. मधून सेवा निवृत्त. सध्या वारकरी सांप्रदायच्या माध्यमातून कीर्तन प्रवचन आणि व्याख्यान करत भगवी पताका खांद्यावर घेत सेवा करण्याचे अतुलनीय कार्य हाती घेतले आहे. आजी माजी कल्याणकारी प्रतिष्ठान सुधागडचे अध्यक्ष, संत ज्ञानेश्वर माऊली विरेश्वर वारकरी सांप्रदाय मंडळचे अध्यक्ष, मा.श्री.मोरया महाडिक आपटवने इंडियन आर्मी (आर्मी मेडिकल कोर)मधून 17वर्षे सेवानिवृत्ती घेत देशसेवा बजावली आहे. या आर्मी सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून मैदानाकडे रवाना झाले. तसेच मैदानावरती मा.श्री. विलासदादा पालवे, राकेश दादा मानकर, मंगेशदादा तलेकर, यांच्या हस्ते नारळ वाढवून सामन्यांना सुरुवात करून सर्व सहकारी साथीदारांनी आणि माझे सर्व आदिवासी प्रतिष्ठान कमिटी ए.सी.सी. कळंब ग्रुप यांच्या समवेत कासारवाडी आणि गाठेमाळ या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या वेळी सुधागड, रोहा, पेण, पनवेल, अलिबाग येथून आलेल्या सर्व खेळाडूंना आदीवासी प्रतिष्ठान संवस्थापक अध्यक्ष मा.श्री.सचिन शंकर सागळे यांनी सर्व आदिवासी टीम खेळाडूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत..
न्युज रिपोर्टर-रायगड/पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार- कु.गणेश राम यादव-मो.8483014657/7218101984
Discussion about this post