शिरूर तालुका प्रतिनिधी:-
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर)
जागतिक महिला दिनानिमित्त ‘छावा’ चित्रपटाचे खास स्क्रिनिंग; शेकडो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग-
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष तेजस यादव यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात निमगाव म्हाळुंगी परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवत आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढत महिला दिनाचा एक वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव घेतला. ‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठीचे पराक्रम, त्याग आणि त्यांना लाभलेली येसूबाईंची साथ याचे सजीव चित्रण झाले आहे. “महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा चित्रपट महिलादिनी दाखवावा, हा हेतू आम्ही बाळगला. आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या माता-भगिनींनी आज स्वतःसाठी हा दिवस अनुभवावा, यासाठीच हा उपक्रम राबवला,” असे तेजस यादव यांनी सांगितले. या प्रसंगी निमगाव म्हाळुंगीच्या मा. उपसरपंच सौ. अश्विनीताई लांडगे, सौ. कविता चौधरी, शालेय समिती अध्यक्ष एकनाथ लांडगे, अजित चौधरी, शिवसेना शाखाप्रमुख दशरथ नागवडे, अरविंद भिवरे, सागर नागवडे, भरत काळे, सुखदेव रणसिंग, नरेंद्र गडदे, प्रसन्न चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांनी चित्रपट पाहिल्यानंतर स्वराज्य रक्षणासाठी महिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव व्यक्त केली. अनेक महिलांनी या उपक्रमाबद्दल आनंद व कृतज्ञता व्यक्त केली.
Discussion about this post