सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक – ११.०३.२०२५
आज दिनांक०८.०३.२०२५रोजी राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ अकलूज ता माळशिरस जि. सोलापूर या कार्यालयास मानव सुरक्षा सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापूर जिल्हा अध्यक्ष ओंकार निंबाळकर व पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय देठे यांनी कार्यालयास भेट देवुन या कार्यालयातील पथकाने केलेल्या कार्य बदल निरीक्षक मा. आर. के. पवार साहेब व सर्व पदाधिकारी याचा सत्कार करण्यात आला.
कार्यालयातील पथकाने केलेल्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील सांगोला, माळशिरस, पंढरपूर, माढा बार्शी, करमाळा या तालुक्यातील अवैध मद्य विक्री व वाहतूक करणाऱ्या विरूद्ध कडक कारवाई केल्याने अवैध धंदे वालेंचे धाबे दणाणले आहेत.
सदर कारवाई मुळे तालुक्यातील सामन्य जनता खुष आहे.तरी या पुढे आशाच मोहीमा आणखी प्रभावीतपणे राबवण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून श्री ओंकार निंबाळकर मानव सुरक्षा सेवा समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष व दत्तात्रय देठे पंढरपूर तालुका अध्यक्ष यांनी निरीक्षक राज्य शुल्क, भरारी पथक क्र २ चे आर. के. पवार साहेब व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पुढील वाटचालीसाठी सर्वाना शुभेच्छा देण्यात आले.
Discussion about this post