अहमदपूर, १० मार्च २०२५ (सोमवार):
किनगाव ते अहमदपूर रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. मोटारसायकल आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक झाल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पिकअप वाहनाने मागून येऊन मोटारसायकलला धडक दिली, त्यामुळे दुचाकीस्वार खाली पडला आणि पिकअप त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचे डोके चेंदामेंदा झाले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
अपघातग्रस्त मोटारसायकल अंबाजोगाई पासिंगची असून तिचा नंबर MH-44 E-5283 असा आहे. या दुर्घटनेचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.
अहमदपूर प्रतिनिधी:
मुंढे विनोद श्रीमंत
📞 9049234970
Discussion about this post