प्रतिनिधी :- शंभोनाथ रणक्षेञे
सेलू – परभणी येथे राहणारी दहा वर्षाची चिमुरडी मुलगी भंगार वेचण्याचे काम करत होती दररोज प्रमाणे ती मुलगी भंगार वेचण्यासाठी गेली होती दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारच्या सुमारास त्या बालिकेला दोन नराधमांनी बळजबरीने उचलून नेऊन कॅनल मध्ये तिच्यावर रात्रभर अत्याचार करण्यात आला आणि सकाळी ती मुलगी आली व रात्री घडलेली घटना आईला सांगितली आणि नंतर गौतम नगर येथे राहणारे यशोदीप कनकुटे व श्रवण टेकुळे या गुन्हेगार वृत्तीच्या लोकांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजेत आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
जिल्हाधिकारी यांनी हा खटला फास्ट कोर्टात चालवावा जेणेकरून महिला व मुलीवर अत्याचार करण्याचे कोणाचेही धाडस होणार नाही म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की आपण या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन हे प्रकरण हाताळावे व आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी.
पीडित मुलीच्या कुटुंबास दहा लाख रुपयाची शासनाने मदत करावी.
त्या आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी. या सर्व मागन्या घेऊन लहू क्रांती संघर्ष सेना संघटनेच्या वतीने शिरूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि तहसीलदार द्वारा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर लहू क्रांती संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष राजू जी कसबे साहेब, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे,महाराष्ट्र संघटक विठ्ठल नाटकर, मराठवाडा संघटक नितीन खनपटे, परभणी युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सौदागर, परभणी जिल्हा उपाध्यक्ष विकास अंभूरे,जालना युवक जिल्हाध्यक्ष सुनील थोरात, सेलू युवक तालुकाध्यक्ष सुनील अंभोरे, महिला आघाडी परभणी जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई चव्हाण, मोरेगाव सरपंच महादेव लोंढे,भिवाजी गायकवाड, सुंदर कसाब,अशोकराव साठे, दिनकर थोरात, रामजी लोंढे, सुनील साठे, विलास गायकवाड, सखाराम पारवे, सुभाषराव चव्हाण, नितीन घोडे,अजय गवळी,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post