कोकमठाण, १० मार्च २०२५:
संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
आज सोमवार, १० मार्च रोजी कोकमठाण येथील माता-भगिनींनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेतली, तसेच आरोग्यविषयक सल्ला व मार्गदर्शन मिळवले.
या उपक्रमाचा अनेक विद्यार्थिनी, युवती आणि महिलांनी लाभ घेतला. आरोग्य हीच खरी संपत्ती असून, सुदृढ महिला हाच सक्षम समाजाचा पाया आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
– कोकमठाण प्रतिनिधी



Discussion about this post