सातारा (अनिलकुमार कदम प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यातील नदीजोड प्रकल्पाला निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील तरतुदीने मोठे पाठबळ मिळेल. गोदावरी पुनर्भरण आणि मराठवाडा ग्रीडसाठी केलेल्या अर्थिक तरतुदीमुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
०००००
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेला 2025-2026 च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांबरोबरच लोककल्याणाच्या योजनांना गती देण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. या योजनांच्या माध्यमातून राज्याचा विकासाचा वेग आणखी वाढेल, असा विश्वास जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.
०००००
राज्याच्या अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या विकासाची गती वाढविणारा आहे. अर्थसंकल्पात ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग आणि नवी मुंबई व खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापर केंद्रे निर्माण करण्याच्या घोषणेमुळे नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्यातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थपूर्ण असा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात शेती, शिक्षण, सिंचन, महिला, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, मनुष्यबळ विकास, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या सर्व क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेतकरी, महिला, युवा, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी, दिव्यांग या सर्व घटकांना अर्थसंकल्पात न्याय देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्याच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मत पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले.
०००००
राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व घटकांचा समतोल विकास साधण्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारा, सर्वांगीण विकासाला गती देणारा असल्याची प्रतिक्रिया इतर मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.
०००००
शेतकऱ्यांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेवूनच उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प मांडला आहे. कृषी विभागाच्या योजनांसाठी एकूण 9 हजार 700 कोटींची भरीव तरतूद केली आहे असे मत कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची कामे व जनकल्याणाच्या योजनांमुळे विकासकामात महाराष्ट्र नवी झेप घेईल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.
०००००
राज्यातील सर्व घटकांना विकासाची संधी देणारा, आणि पायाभूत सुविधांसह ग्रामीण भागातील सुविधांना बळकटी देत ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
०००००
राज्यातील आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, गडकिल्ल्यांचे संवर्धन, त्याचप्रमाणे औद्योगिक विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकास पथावर नेण्याचे कार्य या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होणार असल्याचे मत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
Discussion about this post