
प्रतिनिधि किरण पाठक अंमळनेर..
अमळनेर : डीपी रस्त्याच्या साईट वर लावलेले दोन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना ९ मार्च सायंकाळी ते १० मार्च सकाळ दरम्यान घडली.
भिकाजी लक्ष्मण पाटील रा फोपोरे हे उमेश शहा यांच्या श्रेयस कन्स्ट्रक्शन मध्ये साईट इंजिनियर म्हणून कामाला असून त्यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ सी वाय ४२५० हे चालक अशोक मोरे याने ९ रोजी रात्री धुळे रोडवरील हॉटेल साई प्रसाद शेजारी असलेल्या कामाच्या ठिकाणी लावून निघून गेले होते. सकाळी ट्रॅक्टर दिसून आले नाही. आजूबाजूला शोध घेतला मात्र ट्रॅक्टर आढळून आले नाही म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता ३०३(२) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत..
Discussion about this post