
प्रतिनिधी किरण पाठक , अमळनेर
अमळनेर-येथील काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसंदर्भात अमळनेर प्रांताधिकारीना निवेदन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील,पक्ष निरीक्षक भास्करराव काळे,ओबीसी अध्यक्ष अशोक पाटील बयांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.यात महायुतीच्या सरकारने सत्तेमध्ये येण्यापुर्वी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासीत केले होते की, सर्वांना सरसकट कर्ज माफी देणार पण अद्याप केलेले नाही”,यावर्षी कापसाला पाहिजे तसा हमी भाव मिळाला नाही. म्हणून शेतक-यांना प्रति क्विंटल ५०००/-प्रमाणे अनुदान देण्यात यावे,अमळनेर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कापुस हा अद्यापही घरात पडलेला असून सी.सी. आय. सुरु करण्यात यावे.अमळनेर तालुक्यात यावर्षी मका, गहू, हरभरा, भरडधान्याचे शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावे.अतिवृष्टीच्या पंचनाम्यामध्ये काही ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची नावे पंचनाम्यात नजर चुकीने राहुन गेली असून ग्रामसेवकांना सक्तीचे आदेश करुन सुटलेली नावे तात्काळ समाविष्ट करण्यात यावी आदी मागण्या यात करण्यात आल्या आहेत.
सदर निवेदन देताना जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील,तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, कविता पवार, भारती भटाजीराव पाटील,अनंत निकम,युवक अध्यक्ष परेश शिंदे,सुनिल अहिरराव,अक्षय पाटील,वासुदेव पवार,ईश्वर पाटील,कल्पेश गुजर विनोद बोरसे यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
Discussion about this post