“मलकापूर सार्वजनिक बांधकाम विभागात माहिती अधिकाराचे सर्रास उल्लंघन !”
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि शासन लोकाभिमुख करण्यासाठी पारीत करण्यात आलेल्या माहिती अधिकार अधिनियमाचे साबांविचे सहायक अभियंता तथा जनमाहिती अधिकारी सचिन तायडे सर्रास उल्लंघन करत असल्याची माहिती समोर आली असुन माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता भाई राजेश इंगळे यांनी एका माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेली माहिती तायडे यांनी नाकारल्याने व्यथित होऊन इंगळे यांनी कार्यकारी अभियंता एस.पी.थोटांगे यांचेकडे अपिल दाखल केले असता १५दिवसाच्या आत माहिती पुरविण्यात यावी असा आदेश पारित करण्यात आला आहे.

या आदेशाला मात्र सचिन तायडे यांनी केराची टोपली दाखवली आहे.सचिन तायडे यांनी या कायद्याचे महत्व गंभिरपणे जाणुन घ्यावे तसेच या कायद्याची लोकाभिमुखता समजुन घ्यावी अशी अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post