बदलापूर प्रतिनिधी :- रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांची झाली आहे मुंबईची लाईफ-लाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. ऐन कामाला जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेवरील बदलापूर-अंबरनाथ स्थानका दरम्यान सिग्नल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे ही जवळपास ३० ते ४० मिनिट उशिराने धावत आहेत. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे.

या तांत्रिक बिघाडामुळे बदलापूर कडे येणाऱ्या रेल्वे गाड्या या उशिराने धावत असल्याकारणाने बदलापूर रेल्वे स्थानकावरती प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून येत आहे रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे की बदलापूर वरून सुटणाऱ्या लोकल गाड्या या नेहमी उशिराने धावत असतात यामुळे ऑफिसमध्ये पोचण्यास नेहमीच उशीर होत असतो बदलापूर स्थानक वरून १०.२६ ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने सुटणारी लोकल ही जवळपास ४० मिनिटे उशिराने सुटली असल्याकारणाने या लोकलमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याने चाकरमान्यांचे खूप हाल तर झालेच पण ऑफिसला पोहोचण्यास ही उशीर झाले या सर्व कारणांमुळे बदलापूर रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी आहे

Discussion about this post