पाटण : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. पाटण तालुक्यातील शरदचंद्र पवार गटाचे नेते श्री सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं ‘निषेध आंदोलन’ सुरु आहे. बदलापूरमधील शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं. त्यानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ‘निषेध आंदोलन’ केलं जात आहे.
पाटण शहरात हातात काळा झेंडा घेऊन मूक आंदोलन करण्यात आले शांततेच्या मार्गाने महाविकास आघाडी महिला अत्याचाराच्या विरोधात निषेध नोंदवत झेंडा चौक येथून मोर्चा पाटण तहसीलदार कार्यालयापर्यंत सकाळी 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत एक तास हे आंदोलन केलं गेले.यात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.बदलापूर, कोलकाता, कराड व पाटण तालुक्यात तारळे भागात होत असलेल्या अल्पवयीन मुलींवर व महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या क्रूर घटनांचा पाटण शहरातून शरदचंद्र पवार गटाचे नेते श्री. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली मुक मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
या वेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील पालकमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री.शंभूराज देसाई यांच्या नैतिकता सांभाळत असलेल्या पालकमंत्री पदांचा राजीनामा द्यावा अशी कडाडून मागणी करण्यात आली. क्रूर अत्याचार करणाऱ्या नराधमांना सरकार पाठीशी घालून मुक गिळून शांत बसण्याच प्रयत्न करत आहेत.अत्याचार करणाऱ्या घटनांमधील दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच महिला अत्याचारांच्या विरोधात सरकारने कडक कायदे,व शिक्षा कराव्यात या मागण्यांचे निवेदनही तहसीलदार यांना सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या मुक मोर्चामध्ये पाटण तालुक्यातील महिला,विद्यार्थी, विद्यार्थीनी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी,विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पत्रकार बंधू- भगिनी युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पाटण शहरात मोठ्याप्रमाणात कडकडीत महाराष्ट् बंदला लोकांनी प्रतिसाद दिला.

Discussion about this post