
आज भर पावसात महाबळेश्वर येथे
बदलापूर मधील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील एका कर्मचाऱ्याने घृणास्पद अत्याचार केल्याच्या घटनेचा महाबळेश्र्वर तालुका महाविकास आघाडी चे विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांचे वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या नराधम गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याऐवजी शासन ही अत्याचारी घटना निमूटपणे सहन करुन एक प्रकारे जनतेवर अन्यायच करत आहे, त्यामुळे या अशा अन्यायकारी शासनाचाही काळया फिती बांधून निषेध करण्यात आला तसेच महाबळेश्वर पोलीस स्टेशन इनामदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बंडूशेठ कुंभारदरे साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ अप्पासाहेब साळुंखे. सातारा जिल्हा उपाध्यक्ष आशिष चोरगे. महाबळेश्वर शिवसेना शहराध्यक्ष राजाभाऊ महाबळेश्वर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार तालुकाध्यक्ष सुभाष कारंडे. युवा सेना शहराध्यक्ष आकाश साळुंखे. चंद्रकांत पांचाळ.अरुण बावळेकर,शंकर ढेबे, अमोल साळुंखे शहनवाज खारखंडे,आबा पारठे, जितेश कुंभारदरे,दीपक ताथवडेकर,अभिजीत कानडे आसिफ भाई महापुळे, राहुल साळुंखे, ओजेफ वाईकर, अलतमेश पन्हाळकर, आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी दिपक जाधव तळदेव महाबळेश्वर
8275929314
Discussion about this post