विधान भवनामध्ये दशनाम गोसावी समाजाबद्दल प्रश्न मांडणारे व श्री क्षेत्र शेगाव येथे गोसावी समाजाला एक एकर जागा मिळवून देण्यासाठी मदत करणारे आमदार संजय भाऊ कुटे यांचा दशनाम गोसावी समाधी बचाव समिती तर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

तसेच माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल, पुरुषोत्तम शेगोकर यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. दशनाम गोसावी समाजाला वेळोवेळी मदत करणारे समाज भूषण अधिकारी ब्रह्म गिरी (पोलीस निरीक्षक), दिलीप भारती (पोलीस उपनिरीक्षक) व सहदेव पुरी (पशुधन पर्यवेक्षक ) ऍड विकास गिरी (उच्च न्यायालय औरंगाबाद) यांचाही यावेळी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहावे असे आव्हान दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत गिरी, विदर्भ प्रदेशाध्यक्ष गजानन गिरी, प्रदेश सरचिटणीस संतोष भारती युवा अध्यक्ष वाल्मिकी, युवा उपाध्यक्ष राजेश पुरी आदींनी केले आहे.
Discussion about this post