दौंड तालुका प्रतिनिधी-ता.२५/८/२४ दौंड तालुक्यातील अखंड मराठा समाज अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मा.मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेला होता.
मराठा समाजातील इच्छुक उमेदवार
विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवारासह मराठा समाजा अंतरवाली येथे दौंड तालुक्याचा कार्य अहवाल घेऊन गेले होते, सोबत दौंड तालुक्यातील विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार म्हणून वसंतराव साळुंखे राजाभाऊ तांबे या दोघांनी आपला कार्य अहवाल दादा जरांगे पाटील यांच्याकडे सादर केला आहे.
उमेदाराबाबत घोषणा
मा. जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली तर या दोघांपैकी जो उमेदवार दादा जाहीर करतील तो उमेदवार फायनल राहिल असे सांगितले
उपस्थित बांधवांची मागणी
उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी एक मुखाने राजाभाऊ तांबे यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे परंतु मनोज दादा जो निर्णय देतील तो अंतिम राहील हे सर्वांनी मान्य केले आहे.
सरकारला इशारा
मा. मनोजदादानी सांगितले की मला राजकारणात पाय ठेवायला लावू नका राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल मी राजकीय भाषा बोलतो कारण तुम्ही आरक्षण देत नाही तुम्ही आरक्षण द्या ,राजकीय भाषा बंद करतो आरक्षण देणार नसाल तर माझ्याकडे पर्याय नाही माझ्या समाजाचे मतदान घेऊन माझ्या समाजाच्या लेकराचे वाटोळे करणार असाल, तर खुर्ची मिळू देणार नाही .
शेतकरी बांधवांसाठी पण कार्य करणार
लवकरच शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मा.मनोजदांनी सांगितले.सर्वच समाजातील बरेच प्रश्न सोडविण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न करणार आहे.
Discussion about this post