सुधाकर पठारे सातारचे नूतन पोलीस अधीक्षक
सातारा
महाराष्ट्र राज्य गृहविभागातर्फे आज पोलीस अधीक्षक उपयुक्त अप्पर पोलीस अधीक्षक पदाच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या
सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर अस्लम शेख यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी ठाणे शहर पोलीस उपायुक्त पदी असलेले सुधाकर पठारे यांची वर्णी लागली आहे.
समीर शेख हे मूळचे ठाण्याचे बदल्यांचे वारे वाहुलागताच आपल्या मूळ गावी म्हणजे ठाणे या ठिकाणी बदली मिळावी म्हणून शेख साहेब प्रयत्नशील होते मात्र ठाण्यापासून जवळच आणि अत्यंत महत्वाचे समजले जाणारे मुंबई शहर या ठिकाणी उपयुक्त म्हणून त्यांना बदली मिळाली
आय पी एस ट्रेनिंग नंतर साताऱ्यात त्यांची सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली
त्या दोन वर्षात त्यांनी आपल्या वेगळी कामाचा ठसा उमटवत सातारकरांच्या मनात स्थान निर्माण केले.
दोन वर्षातच बढतीवर त्यांना गडचिरोली या नक्षल ग्रस्त भागात नियुक्ती करण्यात आली त्या ठिकाणी ही त्यांनी अत्यंत चांगले काम केले त्यांनी त्या ठिकाणी केलेल्याकामाची दखल घेत नुकतच शासनाने त्यांना विशेष पोलीस पदक जाहीर केले येत्या १५ ऑगस्ट रोजी त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे तत्पूर्वी त्यांची साताऱ्यातून बदली झाली
समीर शेख यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे कम्बर्डे मोडीत काढत तडीपारीचे शतक पूर्ण केले, अनेक गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का लावत तुरुंगाचा रस्ता दाखवला
अत्यंत लोकप्रिय आणि चोवीस तास उपलब्ध अधिकारी म्हणून त्यांचे नाव लौकिक आहे.
गुन्हेगारीवर अंकुश कस्तनाच सामाजिक भान ठेवत त्यांनी अनेक योजना राबविल्या ,स्वराज्याच्या चौथ्या राजधानीत त्यांनी गडकिल्ले स्वछता मोहीम राबविली या मोहिमेत त्यांनी स्वतः जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या स्वछता केली यात त्यांच्या पत्नी आझा यांनी हि सहभाग घेतला
गुन्हेगारी जगतात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग अत्यंत चिंतेची बाब असून अल्पवयीन तसेच बेरोजगार तरुणांचे गुन्हेगारी कडे वळणारे पाय “उंच भरारी” योजनेतून नोकरी आणि व्यवसायाकडे वळवण्याचे मोलाचे काम त्यांनी केले जिल्ह्यातील शेकडो तरुणांना प्रशिक्षण देऊन जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये कामावर लावले.
सातारा शहरालगत असलेल्या प्रतापसिंह नगर भागात असलेल्या गुन्हेगारीचे बिमोड करण्यासाठी जिल्हा प्रशासना बरोबर मिळून त्यांनी गुन्हेगारांच्या साम्राज्यावर बुलडोझर फिरवला आणि परिसरात कायद्याचे राज्य स्थापित केले
अत्यंत गोपनीय रित्या राज्यशासनाच्या आदेशाचे करत त्यांनी रातोरात प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरी शेजारील अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याचे हिमतीने काम करून दाखविले
त्यांच्या दोन वर्षांच्या काळात स्थानिक गुन्हे शाखा पथकाने LCB रेकॉर्ड ब्रेक कारवाया करत दरोडे घरफोडीचे गुन्हे उघड करत कोट्यवधींचे सोने हस्तगत करत फिर्यादींना परत केले त्यांनी LCB पथकाला केलेले मार्गदर्शन आणि दिलेल्या फ्री हॅन्ड मुळे पथकाची कामगिरी राज्यात अव्वल ठरली.
समीर अस्लम शेख अर्थात शेख साहेब म्हणून जनसामान्यात लोक प्रिय अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मुंबई येथे ही अत्यंत उच्च दर्जाची कामगिरी करतील यात तिळमात्र शंका नाही, समस्त सातारकरांच्यावतीने त्यांना भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
Discussion about this post