लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात संवाद उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे साहेब व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. समवेत अहमदपूर-चाकूर विधानसभेचे आ.बाबासाहेब पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
जनतेचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्रभर ही यात्रा सुरु आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. माझ्या मायमाऊली आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करतात. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळही मिळत नाही आणि पैशांची सुद्धा चणचण असते. नेमका हाच विचार करून महायुती सरकारने ‘माझी लाडकी बहीण योजना’ आणली. या योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणींच्या बँक खात्यात प्रतिमहिना १५०० /- रुपये जमा होतायेत.
सरकारकडून तरुणांना प्रशिक्षण भत्ता सुरु आहे. गोरगरिबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात असून शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आहे. बेरोजगारी आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात नवीन उद्योगधंदे कसे सुरु होतील, उद्योजक आपल्या राज्यात गुंतवणूक करतील, याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. याशिवाय मधल्या काळात आम्ही कोतवालाचं मानधन वाढवलं, पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं, अंगणवाडीचं मानधन वाढवलं. याप्रमाणे आम्ही निर्णय घेत राहू. याकरिता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना साथ द्यावी अशी विनंती करीत यापुढे विकासाचा हा रथ असाच चौफेर करेल असा शब्द ही उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी याप्रसंगी दिला.

Discussion about this post