एकमेकांशी #व्यवहारिक देवाणघेवाण, #शेती , पशुपालन या गोष्टींनी #गावगाडा सुरळीत सुरू होता पण या अधुनिक जगतात काही गोष्टींनी असा शिरकाव केला की तो आता समस्त लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. जसे की #मोबाईल त्याशिवाय आता पुढे कोणीच कल्पनाही करू शकत नाही एवढे त्याचे स्थान आपल्या दैनंदिन जीवनात झाले आहे.
त्यामुळे tv मोबाइल #recharge आणखीन #online झालेल्या योजना इत्यादी बऱ्याच आधुनिक यंत्रणेमुळे ग्रामीण भागातही आता उदरनिर्वाह करण्यासाठी अधिक पैसे लागतात. बदलते #नैसर्गिक #वातावरण, शेतीला योग्य तो भाव नसणे, शहरापासून दूर जात असणारी लोकसंख्या याचा फटका ग्रामीण भागात बसतो आहे त्यामुळे खेड्या पाड्यातील माणसालाही आता पैशासाठी शहराची वाट धरायला लागते.
त्याला माहित आहे खरे सुख हे या गावातच आहे परंतू या आधुनिक जगतात पैशाला एवढे महत्त्व आले आहे की शहरात किंवा शहरालगत आपण असायला पाहिजे या भावनेतून नाईलाजाने माणसे गाव सोडून #शहरात अडकली गेली आहेत🙆🏻♂ माणुसकी अन आपुलकी सापडते ती गावात आणि त्या साध्या भोळ्या माणसातच ! शहराच्या गर्दीत तर क्षणभर #विश्वास ठेवावा याचीही #पंचायत आहे 💯
Discussion about this post