सोमनाथ घोंगाणे
नांदगाव ( नासिक ) प्रतिनिधी
राज्य सरकारने राज्यातील महिलां मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण सारख्या योजना सुरू केल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण आठवते पण लाडक्या बहिणीच्या सुरक्षेसाठी काय केले याशिवाय राज्यातील अंगणवाडी सेविका आशा वर्कर यासह सर्वच महिलांना विविध योजना राबविण्यात आल्या मात्र शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना का डावलले कदाचित शालेय पोषण आहार समितीच्या महिला या तुमच्या सावत्र बहिणी असतील अशी खरमरीत टीका दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केली नांदगाव येथे आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना ग्रामिण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून नाशिकचे माजी खा. समीर भुजबळ हे उपस्थित होते.
यावेळी खा. भगरे यांनी केंद्र व राज्य सरकार वर टीका केली व लाडकी बहीण योजना म्हणजे आपलेच पैसे घेऊन आपल्याला परत करायचे आणि त्याचा गाजावाजा करायचा असे धोरण आहे पंतप्रधान किसान सन्मान योजना म्हणजे शेतकऱ्यांकडुन शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूवर १८ टक्के जीएसटी लावून वसुल करायचे व ६ हजार वर्षाला शेतकऱ्यांना द्ययाचे असाच प्रकार राज्यात देखील सुरू आहे मुळात शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांसाठी खासदार सुप्रिया सुळे या लढत आहेत आणि लवकरच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल यातून सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना नक्कीच न्याय द्ययाचे काम आम्ही करू असेही खासदार भगरे म्हणाले यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की राज्यातील हिस्सा मिळाला आहे .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच शालेय पोषण आहार समितीच्या महिलांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ केली असुन केंद्र सरकारचा हिस्सा मिळण्यासाठी वाट बघावी लागेल मात्र आम्ही दिल्लीत आपला मुद्दा मांडुन आपल्याला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत याशिवाय महिलांना विमा संरक्षण व किमान वेतन कायद्याच्या अंतर्गत त्यांच्या वेतनात कशी वाढ करण्यात येईल याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले यावेळी मी राज्यातील सर्व शालेय पोषण आहार समितीच्या माझ्या बहिणींना रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून आपल्या मागण्या मान्य करेपर्यंत स्वस्त बसनार नाही असेही आश्वासन दिले.तर महिलांना एकत्रित करून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढणाऱ्या संगिता सोनवणे यांचा त्यांनी कौतुक केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात गणेश धात्रक यांनी संस्थेच्या अध्यक्ष संगिता सोनवणे यांचे कौतुक करत ५ दिवस उपोषण केले म्हणून एक हजार रुपये वाढ करण्यात आली आहे आणि तुमच्या मुळे राज्यातील सर्व शालेय पोषण आहार समितीच्या महिलांना पगारवाढ झाली असल्याचे सांगितले तर भविष्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही सर्व पक्षीय नेते असलो तरी तुमच्या कामाला आम्ही सर्व सोबत येऊ असे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत शालेय पोषण आहार समितीच्या महिलांवर राज्य सरकार खरोखरच अन्याय करत आहे त्यांच्या न्यायहक्कासाठी संगिता ताईने जो लढा उभारला त्या लढ्याला आमचा जाहीर पाठिंबा आणि जिथे गरज लागेल तिथे आम्ही हजर राहू असे मत व्यक्त केले.यावेळी भारतीय काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज चोपडे, रिपब्लिकन पक्षाचे नाशिक ग्रामीण सरचिटणीस कपिल तेलुरे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे,शशिकांत मोरे,श्रावण आढाव,ऋषभ बोरसे,आदींनी भाषणे करून शुभेच्छा दिल्या तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोनीया सोर, रेखा शेलार, आशाबाई काकळीज, चंद्रशेखर कवडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकध्यक्ष विजय पाटील विनोद शेलार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सरला मोढे,संगिता मोकळं,संजय जमधाडे, सुनील उशिरे,ज्योती मोरे,रत्ना सोनवणे, शैला भाबड, सुनीता कुलकर्णी, कुंदा दळवी,जिजाबाई मोरे,जिजाबाई बोदके,आदींनी केले.सूत्रांसनचाल प्राध्यापक विनोद आहिरे यांनी तर आभार प्रदर्शन संजय जमधाडे यांनी केले.यावेळी स्वर संबोधी ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला.
राज्यातील पोषण आहार समितीच्या वतीने समीर भुजबळ यांना बांधली राखी…!
शालेय पोषण आहार समितीच्या महिलांचा प्रश्न मार्गी लावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला वंचीत ठेवले त्यामुळे तुम्हीच आमचे भाऊ आहात असे म्हणत अध्यक्ष संगिता सोनवणे यांनी संपूर्ण राज्यातील शालेय पोषण आहार समितीच्या महिलांच्या वतीने राखी बांधली याला समीर भुजबळ यांनीही दुजोरा देत तुमच्या सर्व मागण्यांसाठी मी व माझा पक्ष संपूर्ण ताकतीने लढू असे वचन दिले.
Discussion about this post