लाडके निवृत्त शिक्षकांची सेवक म्हणुन निवड रद्द करा
अरविंद गांगुलवार
पांढरकवडा – महाराष्ट्र शासनाच्या वतिने शिक्षकांच्या रिक्त
पदी व पेसा अंतर्गत येणाऱ्या गावात स्थानिक निवृत्त शिक्षकांना
विसहजार रुपये मानधनावर कामावर घेण्याचे आदेश पारित झाला आहे. वयाच्या अठ्ठावन वर्षापर्यंत सेवा करुन आज पन्नास ते साठ हजार रुपये निवृत्ती वेतन घेवुन आनंदी जीवन जगत असणाऱ्या शिक्षकांनी शासनाकडे परत कामावर घेण्यासाठी विनंती केली नाही परंतु शासनाच्या विविध लाडक्या योजनाच्या तडाक्यात आता निवृत्त शिक्षकांना कोणत्या तत्वावर कामावर का घेतल्या जात आहे. हे कळत नाही.
आज महाराष्टात सुमारे चाळीस हजाराचे वर शिक्षक पदे रिक्त आहे. दिवसेंदिवस शिक्षक निवृत्त होत असुन रिक्तपदाची संख्या वाढत आहे.
त्यामानाने पवित्र पोर्टल द्वारा शिक्षकांच्या पाहिजे त्या प्रमाणात भरल्या जातनाही. म्हणुन तात्पुरती व्यवस्था म्हणुन का निवृत्तांना निवडावे?
आज प्रत्येक गावात उच्च विद्याभुषित बेरोजगाराची संख्या
खुप आहे. त्यांच्या हाताला काम नाही. तेव्हा अशा सुशिक्षित
बेरोजगारांना विसहजार मानधन देवुन स्वयसेवंक पदि निवड
करावी. निवृत्ताचे लाड आता बंद करावे, अशी मागणी म रा
शिक्षक समितीचे नेते अरविंद गांगुलवार यांनी केले आहे.
ता. प्र. गणेश बेतवार
Discussion about this post