ई-पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणी दुर करा
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी
पांढरकवडा : केळापूर तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकादारांना पॉस मशीन मधून धान्य वाटप करताना येणाऱ्या अडचणीमुळे दुकानदारांना लाभार्थीच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या मशिनच्या तांत्निक अडचणी सोडविण्यात याव्यात. अशी मागणी केळापूर तालुका स्वस्त दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्याकडे केली आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी धान्य दुकानदारांना शासना तर्फे अद्ययावत पॉस मशिन देण्यात आले. या मशिनमध्ये वाटपासाठी येणाऱ्या अडचणी सुटतील असे दुकानदारांना वाटत होते, मात्र प्रत्यक्षात वेगळा अनुभव येत आहे. हे मशिन
एकतर लवकर कनेक्ट होत नाही, त्याला पुरेशी रेंज नसणे, कधीही बंद पडणे, अनेक वेळा लाभार्थी धान्य वाटप सुरू असताना अनेकदा हे मशिन बंद पडल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. त्यामुळे याचा मनस्ताप सहन न झाल्याने दुकानदारांना लाभार्थीच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ अनेकदा येते. त्यामुळे धान्य वाटपासाठी अनेकदा विलंब होत आहे. त्यामुळे हा प्रकार थांबून मशिनमध्ये होणाऱ्या तांत्रिक अडचणी
सोडविण्यात याव्यात. तसेच दर महिन्याच्या ५ तारखे पूर्वी ऑनलाइनला साठा उपलब्ध व्हावा. पॉस मशीन सर्व्हर प्रॉब्लेम मुळे बंद असून वाटपास विलंब होत आहे. महिन्या अखेर पर्यंत वाटप होणे शक्य नाही. माहे जुलै २०२४ च्या वाटपाची मुदत १० ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर हरजिंदरसिंह सोखी, रफिक खोकर सुभाष मुथा, शंकर जयस्वाल, सुनील पडलवार, संतोष बेतवार, महेश झाजेरिया, राकेश पडलवार, पारस पितलीया, राजू
कडू, आर. आर कुमरे, दिलीप मुथा, युसुफ भाई, तसेच इतर दुकानदारांच्या सह्या आहेत.
रेशनकार्डधारक वैतागले
सतत येत असलेल्या सर्व्हर डाऊन तांत्रिक समस्येमुळे रास्त भाव दुकानदार यांच्यासह रेशनकार्ड धारक वैतागले आहेत. संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करून सदरील समस्या सोडवून रास्त भाव दुकानदार व रेशन कार्डधारकांची समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे. सर्व्हर प्रॉब्लेम तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण व वई केवार केवायसी व्यवस्था पूर्णपणे खोळंबली आहे. त्यामूळे धान्य वितरण व ई केवायसीची मुदतवाढ देण्याची मागणी रास्त भाव दुकानदार यांच्यासह रेशनकार्ड धारकांमधून होत आहे.
एका ग्राहकामागे एक तास
सव्र्व्हर डाऊन राहत असल्याने धान्य घेताना एका ग्राहकामागे एक-दोन तास लागतात. ग्राहकांच्या मते धान्य आणायला गेले की कधी धान्य मिळत नाही किंवा कधी सर्व्हर डाऊन असतो. प्रतीक्षा करण्यात पूर्ण दिवस वाया जातो. रोज दुकानात जाऊन धान्य मिळेल की नाही, असे विचारावे लागते. नुसता मनःस्ताप झाला आहे.
Discussion about this post