करमाळा तालुका प्रतिनिधी : नितीन चोपडे
( लोकमंगल बँक व सर्वोदय प्रतिष्ठान यांच्या वतीने 4 ऑगस्ट 2024 रोजी करमाळा येथे संपन्न होणार मराठा उद्योजक मेळावा…)
मराठा तरुण- तरुणीच्या आर्थिक उन्नतीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना बाबत लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी करमाळा शहरातील विकी मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी ठीक दहा वाजता मराठा उद्योजक मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश निमंत्रित सदस्य व सर्वोदय प्रतिष्ठान करमाळा अध्यक्ष श्री. दिपक चव्हाण यांनी दिली. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकमंगल नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे कर्तव्यदक्ष आमदार सुभाष ( बापू ) देशमुख तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास मान्यवर म्हणून महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे समन्वयक व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व संघटन मंत्री माननीय अभिजीत पाटील व हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. करमाळा शहर व तालुक्यातील तरुण-तरुणी यांनी उद्योजक म्हणून नवीन व्यवसाय उभारण्यासाठी सदर मेळाव्यास उपस्थित राहून सहकार्य करावे व या योजनेचा लाभार्त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक
दिपक चव्हाण व शिवाजी रामचंद्र पाटील यांनी केले आहे.
Discussion about this post