आठघराणे बलेकरवाडी येथे साजरा केला सामुदायिक रक्षाबंधन सण
रत्नागिरी तालुक्यातील कांबळे लावगण या गावातील महालक्ष्मी महिला मंडळ आठघराणे बलेकरवाडी या महिला मंडळाच्या वतीने सामुदायिक रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा कौटुंबिक आणि सामाजिक संदेश देणारा सण म्हणुन या सोहळ्याला वाडीतील सर्वच महिला व पुरुष तसेच लहान मुलं-मुली उपस्थित होते. महालक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा मानसी बलेकर आणि सचिव रीना बलेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि या सोहळ्याला सल्लागार
श्री. तुकाराम बलेकर,मोहन बलेकर, मंगेश बलेकर, अरुण बलेकर, राजेश बलेकर, अमर बलेकर,सचिन बलेकर,वितेश बलेकर,संदीप बलेकर, प्रशांत बलेकर, यांच मार्गदर्शन लाभलं. सामुदायिक रक्षाबंधन या सणाचे हे तिसरे वर्ष आहे.
या महिला मंडळांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक, स्वच्छता अभियान असे उपक्रम राबवले आहे.रक्षाबंधन या सोहळ्याला राखी ही स्वखर्चाने अमर बलेकर याने दिल्या.त्याच्या या कार्याचे कौतुक आणि मनोगत व्यक्त करताना श्री. तुकाराम बलेकर यांनी रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा.
हा सण बहिण भावाच्या अतुट नात्याचा सण. बहिण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावे असं वचन बहिण भावाकडून घेते हे महत्व पटवून सांगून असंच एकजुटीने आपलं हे नातं टिकून राहावं अशी आठघराणे राजाला प्रार्थना केली.
या सोहळ्याला मालिनी बलेकर, अरुणा बलेकर,संध्या बलेकर,उर्मिला बलेकर, अक्षता बलेकर,संजीवनी बलेकर, स्वरा बलेकर,संगीता बलेकर, वेदिका बलेकर,मीनाक्षी बलेकर,अंतरा बलेकर, अर्चना मांडवकर, आदिती पालकर, हिराताई पिंपळे,भीमाताई निंबरे मकरंद बलेकर, किरण बलेकर, अवधूत बलेकर,उपस्थित होते.
Discussion about this post