सिने अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते किरण भेले सन्मानित
अमरावती प्रतिनिधी – सागर भोगे
नागपूर मधील हॉटेल कोणार्क आर्क मध्ये अभिमान प्रेस्टीज अवॉर्ड शो अविनाश बागडे द्वारा भव्य आयोजन करण्यात आले. या भव्य अवॉर्ड शोमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये महारत हाशिल असलेले कलाकार यांना सुधा चंद्रन यांच्या हस्ते सन्मानित केले. अमरावती येथील गेल्या ३५ वर्षापासून नृत्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मयूर डान्स अकॅडमीच्या संचालिका किरण भेले मॅडम यांना सुधा चंद्रन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. किरण भेले मॅडम यांनी अभिनेत्री सुधा चंद्र यांच्या चित्रपट नाचे मयुरी या चित्रपटांच्या गाण्यावर सुंदर नृत्य प्रदर्शन केले व सुधा चंद्रन मॅडम यांच्याकडून नृत्य वाह-वाही लुटली, व त्यांचे नृत्य क्षेत्रात केले गेलेल्या हजारो कार्य व अनेक विद्यार्थ्याना त्यांनी शिकवलेले नृत्याच्या साठी त्यांना शाबासकी दिली. किरण भेलें मॅडम यांचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांनी आपले नामांकन दाखल केले. अनेक टीव्ही शो मध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य प्रदर्शित केले, अनेक नॅशनल व इंटरनॅशनल प्रतियोगिता मध्ये सहभाग घेऊन प्रथम, द्वितीय अनेक पुरस्कार प्राप्त केले. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात अमरावती शहराचे नाव त्यांनी उंचावले आज त्यांनी घडवलेल्या प्रत्येक कलाकार हा स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करून इतरांना रोजगार देत आहे.
Discussion about this post