ता. प्रीतिनिधी -तालुक्यातील खळेगाव येथे अद्याप कोणत्याही मोबाईल कंपनीचे टॉवर नाही.आणि टॉवर नसल्यामुळे जिओ कंपनीच्या नेटवर्क शिवाय दुसऱी कुठलेच नेटवर्क मिळत नाही.अशातच जिओ नेटवर्क चे रिचार्ज प्लॅन महागल्याने सर्वसाधारण लोकांना न परवडणारे झाले आहे. आणि बि.एस.एन.एल.चे रिचार्ज रेट अर्ध्यातच असल्यामुळे व गावात नेटवर्क नसल्याने खळेगाव येथे टॉवरची आवश्यकता महत्वाची झाली आहे. करिता बि.एस.एन. एल.कंपनीने गावात टॉवर देण्याची मागणी गावाकऱ्यांनी केली आहे.
लोणार तालुक्यातील खळेगाव हे मोठ्या लोकवस्तीचे गाव पण लोकनेत्यांचे लक्षच नाही –
लोणार तालुक्यातील खळेगाव हे कमीतकमी 5000 लोकसंख्येचे गाव असून हे गाव सिंदखेडाराजा विधानसभा मतदारसंघाच्या पूर्वेकडील शेवटच्या सीमेवर येत असून मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या पश्चिम सीमेवर येत असल्यामुळे या गावाकडे कोणत्याही नेत्याचे लक्ष नाही.
जलजीवन मिशन योजनेमुळे गावातील जुन्या पाईपलाईनचे व रस्त्यांचे नुकसान .
जलजीवन मिशन या योजनेच्या माध्यमातून गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी योजना रबावण्यात येते आणि खळेगाव येथील जलजीवनचे काम पाणीपुरवठा विभागातर्गत ज्या ठेकेदाराला दिले त्या ठेकेदाराने सुद्धा काम अर्धवट ठेवले गेले आहे.गावातील जुनी वाटरसप्लाय ची पाईपलाईन तोडून ठेवली,सिमेंट रस्ते, उखडून टाकले. रस्ते उखडून टाकल्यामुळे गावात चिखल झाला व सरळ चालताही येत नाही.त्यामुळे गावकर्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
करिता गावाच्या संपर्कातील आमदार, खासदार व लोकप्रितिनिधी यांनी गावावर लक्ष देण्याची गावकर्यांकडून मागणी आहे.
Discussion about this post