दौंड तालुक्यातील भांडगाव सोसायटीचे संघर्ष योद्धा हरपला

दौंड तालुक्यातील भांडगाव सोसायटीचे संघर्ष योद्धा हरपला

प्रतिनिधी:~दत्तात्रय यादव दौंड तालुक्यातील भांडगाव विविध कार्यकारी सोसायटी मधील भ्रष्टाचार चव्हाट्यावरती आणणारे तसेच सातत्याने सोसायटीतील सभासदांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाबरोबर झगडणारं झुंजणार ...

लोहा प्रतिनिधी प्रा. बबन जोंधळे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिली किरोडा येथील पूरग्रस्त भागाला भेट ; राज्य सरकारने तात्काळ आर्थिक मदत द्यावीलोहा,तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक घरांचे, शेतीचे, खरीप पिकांचे नुकसान झाले तसेच जनावरे दगावली. किरोडा येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडवा द्वारे पाणी गावातील दलीत वस्तीत घुसून अनेकांच्या घराचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले होते. पुराने बाधित झालेल्या घरांची पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. राज्य सरकारने पूरग्रस्त नागरिकांना तत्काळ आर्थिक मदत करावी. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे वंचीत चे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.मुसळधार पावसाने व अतिवृष्टीने किरोडा मालगुजरी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने तलाव ओव्हर प्लो होऊन गावातील दलीत बहुल वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने एकूण २७ कुटुंब बाधित झाले होते. तर प्रकाश जोंधळे यांच्या शेळ्या मृत्यू पावल्या होत्या. अनेकांच्या शेती व पिकांचे नुकसान झाले. त्या बाधित घरांचे आणि शेतीचे स्वतः पाण्यात जाऊन पाहणी केली व पूरग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे वंचीत चे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितले. तसेच किरोडा येथील ग्रामविकास अधिकारी श्रीमती चव्हाण यांच्याशी प्रशासनाकडून होत असलेल्या उचित कार्यवाही संदर्भाने माहिती जाणून घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, अविनाश भोसीकर, तालुकाध्यक्ष प्रमोद धूतमल, प्रा. राजेश ढवळे, बी. बी. गायसमुद्रे, राजाभाऊ बनसोडे, श्याम वाघमारे, विलास कांबळे, रत्नाकर महाबळे, धोंडीबा यानभुरे, बापूसाहेब कापुरे, किरोडा सरपंच शंकर रामराव माने माजी सरपंच भीमराव जोंधळे रमेश वाघमारे गणेश वाघमारे संतोष जोंधळे ग्रामविकास अधिकारी चव्हाण मॅडम प्रा बबन जोंधळे विकास जोंधळे राजकुमार जोंधळे साहेबराव जोंधळे तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम जाधव अशोक माने घ अशोक गायकवाड पोलीस पाटील प्रतिनिधी संतोष जाधव समता सैनिक दलाचे सुभाष खाडे, सिद्धार्थ ससाणे, डोंगरे सह ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती. लोहा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मारोती सोनकांबळे, तिडके आदी पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Page 130 of 140 1 129 130 131 140

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.