सदर व्यक्ती मनोरुग्ण अवस्थेत आपल्या गावात फिरत असून तो भूक पाणी यासाठी याचना करत असतो.पण गैरसमज होऊन त्यांचा आवाज हालचाल पाहून लहान मूले ओरडतात.
सोशल मीडियावर मुले पळण्याच्या बातम्या पसरत आहेत त्यामुळे साहजिकच असे प्रकार झाले तर शंका घेऊन प्रतिकार करण्यात येतो. काल शिरोळ मध्ये जी घटना झाली ती ध चा मा झाला असे म्हणता येईल जशा प्रकारे पासेपारधी,भूत अशा घटना किती रंजकपणे प्रसिद्ध झाल्या होत्या ते आपण 2015 सालीच्या आसपास बघितलं आहे.


त्यावेळी सुद्धा रोजनदारी साठी रात्री कामावर जाणाऱ्या लोकांना त्रास झाला मारहाण झाली .लहानपणी आपल्याला मारुती ओमनी दिसली तरी आपण जोरात रडत पळत होतो याचा अर्थ ओमनी चा मालक मूल चोरनारा चोरटा नसतो. सदर व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याने त्याची अवस्था कपडे नीट नाहीत त्यामुळे भिऊन मुले ओरडलीत त्यानंतर पालक सुद्धा आले आणि जमाव एकत्र जमून या व्यक्तीला जबर मारहाण झाली.व्यक्ती गंभीर जखमी झाला पण अंती तो चोर नाही हे स्पष्ट झाले. जागृत असणे खूप गरजेचे आहे पण गैरसमज होऊन एखाद्याचा जीव जाऊ नये हे पण पाहिलं पाहिजे .
दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला तर जबाबदार व्यक्तीच्यावर गुन्हे दाखल होतील कदाचित जे तरुण आहेत त्यांचे करिअर बाद होईल. म्हणून कायदा हातात न घेता शंका वाटली तर पोलिसांच्या ताब्यात त्या संशयास्पद व्यक्तीला द्या पण शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला मारहाण करून जखमी करणे चुकीचे आहे .
शिरोळ नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की शहरात जे चौक आहेत गल्लीचे प्रवेश क्षेत्र आहे तिथे “उत्तम प्रतीचे” कॅमेरा बसवावे.पोलिसांनी सुद्धा अशा घटना होणार नाहीत यासाठी संशयित लोकांच्यावर नजर ठेवून त्यांची चौकशी करावी.प्रत्येक व्यक्ती हा गुन्हेगार नसतो आणि पेहराव बघून व्यक्तीला चुकीचे समजू नका कारण सज्जन दिसणारे सुद्धा महाठग असतात घातकी असतात. सर्व नागरिकांनी जागृत राहावे आपल्या विवेक बुद्धी सह..
धन्यवाद ..
Discussion about this post