
तळेगाव येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय चा मुख्यमंत्री माझी श्याम सुंदर शाळा प्रथम क्रमांक.
प्रतिनिधी अमोल कोलते फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय चा मुख्यमंत्री माझी श्याम सुंदर शाळा प्रथम क्रमांक मिळवला.
त्यामुळे मा. शहागडकर (BEO) , देशमुख सी. डब्ल्यू. व पिंपळखरे साहेबांनी शाळेला भेट दिली त्यावेळी सरांचे शाळेच्या वतीने सत्कार केला . प्राचार्य श्री. अनिल मोरे, श्री. नाचन सर, श्री. चिंचोले सर, भोवते सर, यांनी शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन मा . गटशिक्षणाधिकारी शहागडकर साहेब व पिंपळखरे व देशमुख सर यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भोईटे सर यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष मा. कैलास पाटील गव्हाड व सर्व पदाधिकारी यांनी शाळेचा केंद्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त करून यापुढे अधिक यशस्वी व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली व अधिकारी वर्गाचे आभार व प्राचार्य अनिल मोरे,प्राध्यापकवृंद ,शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
Discussion about this post