यावल प्रतिनिधी फिरोज तडवी
यावल तालुका कब्बद्दी स्पर्धेचे आयोजन हे डी एच जैन विद्यालय कोरपा वली येथे आयोजित करण्यात आले होते, कार्यक्रमाची सुरूवात ही दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विजय ठाकूर सर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री .कृष्णाजी यादव झांबरे यांना देण्यात आले .या कार्यक्रमात विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी श्री . सुकलाल बोंदर नेहेते,श्री .दत्तात्रय लीलाधर पाटील, श्री .सुधाकर प्रल्हाद नेहेते .शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . चारुशीला विनायक नेहेते . कोरपावली गावाचे पोलीस पाटील सलीम रमजान तडवी . यावल तालुका क्रीडा समन्वयक श्री . संगले सर, श्री .महाजन सर, श्री . फिरके सर .या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत एकूण 17 शाळांचा सहभाग होता.
या स्पर्धेत अंजुमन साकळी हे विजेता व उपविजेता आदर्श विद्यालय दहिगांव हे ठरले .यावल तालुक्यातील क्रीडा शिक्षक शेख सर, खान सर ,राजपूत सर , बोंडेसर ,भालेराव सर , पाटील सर वाय. वाय. पाटील सर , सोनवणे सर ,चिमणकारे सर,महाले सर ,फिरके सर ,संगले सर ,काळकर सर ,बादशाह सर या सर्व क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केले . संस्थेचे चेअरमन श्री राकेश वसंत फेगडे व सचिव श्री . विनायक यशंवत नेहेते यांनी विजेत्या व उपविजित्या संघाचे अभिनंदन केले व इतर सहभागी संघाचे कौतूक केले .
तरूण वर्गात मोठा उत्साह दिसुन येत होता,.डी.एच जैन विद्यालयातील शिक्षक सौ .अर्चना महाजन, दिलीप पाटील,श्री संदिप मोरे सर , सौ . सरोज कोळंबे मॅडम, श्री . मनोज ठाकरे , श्री. संतोष वानखेडे , श्री . दिनेश बारेला तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री . भगवान नेहेते , श्री लूकेश पाटील , जयंत अडकमोल यांनी सहकार्य केले.
Discussion about this post