भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात धनगर समाजाच्या उपोषणाचा पाचवा दिवस असूनसुद्धा शासनाने या कडे दुर्लक्ष केले आहे.राज्यात उद्भभवणरे प्रश्न सोडविणे मुख्य मंत्री यांचे काम आहे.पण धनगर समाजाच्या उपोषणाबाबत जणू आपल्या काहीच माहिती नाही अशा पद्धतीने शासन वागत आहे.
धनगर समाजातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी एका मुलाखतीत सांगितले की शासनाने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, शासनाने धनगर समाजाच्या संविधान प्रविष्ट एसटी आरक्षण अमंलबजावणी च्या मागणी कडे गांभीर्याने पाहिले नाही.प्रसार माध्यमातून सर्वसामान्या पासून शासनापर्यंत सर्वजण पाहत आहेत.पण शासन मात्र या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवते.महाराष्ट्र राज्यातील अनेक लहान मोठ्या समस्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सोडविल्या आहेत.
मग धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता अशी सावत्रपणाची भूमिका का घेतात? स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता सातत्याने संघर्ष च करावा लागत आहे.सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष असो दोघांनी ही धनगर समाजाचे या समस्येचे घोंगडे भिजत ठेवले आहे.
पंढरपूर येथील धनगर समाजाच्या उपोषण करणारे पैकी दिपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.त्यावर दिपक बोराडे यांनी उपचारासाठी नकार दिला.दिपक बोराडे व माऊली हळवणकर या दोघांना शुगर ची समस्या आहे, उपोषण करणारे धनगर समाज बांधव यांचे जीवास काही बरेवाईट झाले तर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या संतापाच्या भावना तीव्र होतील व काही तरी अघटीत घडू शकेल.
त्यावेळी मात्र धनगर समाजाच्या बांधवांना कोणी रोखू शकणार नाही.शासनाने धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी.असे भारत कवितके यांनी एका मुलाखतीत सांगितले.
Discussion about this post