काँग्रेस पक्षाचे युवराज राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये बोलताना त्यांनी देशातील आरक्षण संपवण्याची भाषा केली ही गोष्ट भारतीय संविधानाच्या विरोधातील आहे तसेच भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाला खोडा घालणारी आहे .

काँग्रेस पक्षाने नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाला विरोध केला आहे त्याचीच पुनरावृत्ती काल-परवा अमेरिकेमध्ये राहुल गांधींनी केली राहुल गांधींनी जगाला आपला संविधान विरोधी चेहरा दाखवला आहे अशा पद्धतीने दलित ओबीसी भटक्या समाजाचे आरक्षण संपवण्याची भाषा बोलून संविधानिक गोष्टींना विरोध करणाऱ्या विरोधी पक्षनेते राहुल गांधीना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशारा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांनी दिला .
भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या पुढाकाराने आज सांगली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या राहुल गांधींचा तीव्र निषेध आणि त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार सुधीर दादा गाडगीळ, संघटन मंत्री शेखर भाऊ इनामदार किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैय्या पवार , शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग, प्रकाश तात्या बिर्जे ,श्रीकांत तात्या शिंदे, माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष दादासाहेब कांबळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचे जाहीर केल्यामुळे राज्यातील दलित समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे दलित आदिवासी भटक्या समाजाला भारतीय संविधानाने सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी घटनात्मक रित्या आरक्षणाची तरतूद केली आहे परंतु हे आरक्षण संपवण्याचे कटकारस्थान काँग्रेस पक्ष छुप्या पद्धतीने करत असल्याची कबुलीच राहुल गांधी यांनी दिली आहे.
काँग्रेस पक्षाने नेहमीच संविधानाची तोडफोड केली आहे संविधान कूच कामी करण्याचा काँग्रेस पक्षाचा मानस आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षासह पवार ठाकरे यांना संविधानाचा पुळका आला होता आता राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाहीर रित्या आरक्षण संपवणार असल्याची भूमिका घेतली आहे यावर बोलताना पवार आणि ठाकरेंची काय दातखिळी बसली आहे का? असा सवाल संदीप तात्या ठोंबरे यांनी करून फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या राहुल गांधींना पाय ठेवू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भयंकर छळले होते पदोपदी त्यांचा अपमान केला होता हेच काँग्रेसवाले लोकसभा निवडणुकांमध्ये संविधानांच्याबद्दल खोटे प्रेम घेऊन फिरत होते आणि समाजामध्ये गैरसमज पसरवत होते परंतु राहुल गांधी यांच्या बोलण्याने संविधान आणि आरक्षणाबाबत त्यांचा खरा चेहरा जगासमोर आला .
असून त्यांच्या सुविधान प्रेमाचा बुरखा फाटला आहे असे प्रतिपादन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केले तर शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार असल्याच्या खोट्या अफवा पसरवून राज्यासहित देशभरातील जनतेची दिशाभूल केली परंतु हे फार काळ टिकणार नाही त्यांच्या बोलण्याने त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे भारतीय संविधान आणि आरक्षणाबाबत दूटप्पी भूमिका घेऊन संविधान विरोधी काम करणाऱ्या काँग्रेस आणि गांधी घराण्याने देशाला फसवले आहे देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचे जतन आणि अंमलबजावणी करत आहे यामुळे देशातील आणि राज्यातील दलित ओबीसी भटक्या समाजाला सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आणताना त्यांचा मानसन्मान उंचावत आहेत संविधानाला नमन करणारे देशातील पहिले पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आहेत राहुल गांधीच्या आरक्षण संपवण्याच्या भूमिकेच्या त्यांनी जाहीर निषेध केला.
Discussion about this post