• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

by
February 16, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

चिपळूण पोसरे नियोजित नवीन ग्राममंदिरात मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम !!!
चिपळूण तालुक्यातील निसर्गरम्य ,मध्यवर्ती रस्त्यानजिक बांधलेल्या ” नवीन ग्राममंदिर काजूवाकण ” येथे मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रम येत्या 20 ,21, 22 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होत आहे .!


“एक गाव , एक मंदिर !!” या संकल्पनेतून विस्तीर्ण भव्य जागेत, सर्व भाविकांना मध्यवर्ती ठिकाणी, मुख्य रस्त्यानजिक ,नवीन ग्राममंदिर बांधण्यात आले !!! गावाचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिराचे बांधकाम 2022 ला पूर्ण झाल्यावर ,

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जुन्या मंदिरातील मुर्त्या नवीन मंदिरा स्थापित व्हाव्यात अशी सर्वांचीच इच्छा होती !!! “एक गाव , एक मंदिर !!! “‘ या संकल्पनेसाठी खूप प्रयत्न केले गेले. कदाचित गावदेवीच्या मनात स्वतःला नवीन मंदिरात , नव्या रूपात,पाहण्याची इच्छा असावी !!!

गावात कोणतेही तेढ निर्माण होऊ नयेत म्हणून बहुसंख्य गाव एकत्र असताना देखील, भविष्यातील मोठ्या भरारीसाठी गाव सज्ज झाला .

नवीन मंदिरात नवीन मुर्त्या , स्थानापन्न करण्याचा निर्णय घेण्यात आला .” पर्यटन दर्जा ‘क’ अंतर्गत ” पायाभूत सुविधांसाठी शासकीय निधी तसेच ” सार्वजनिक सभागृह ” याचे बांधकाम देखील याच मंदिराच्या आवारात झाले आहे .

एकूण 56 गुंठे विस्तीर्ण जागेवर भव्य- दिव्य असे देखणे मंदिर बांधलेले आहे !!!
पंचक्रोशीतील अत्यंत देखणे व नयनरम्य बांधलेल्या मंदिरात , मुर्त्यांअभावी ग्रामस्थांच्या व भाविकांच्या श्रद्धेपायी या ठिकाणी यात्रोत्सव तसेच इतर धार्मिक सण – उत्सव देखील सुरू होते .

असंख्य ग्रामस्थ व भाविक या मंदिराला सतत भेटी देत असत !!! अखेर तो क्षण जुळून आला व मुर्त्यांची शास्त्रोक्त , प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला .


तीन दिवस भरगच्च अशा कार्यक्रमानी , मंदिराची नेत्रदीपक उत्सवाची पूर्व तयारी जोरात सुरू आहे .!!!आकर्षक विद्युत रोषणाई , क्षार्पी , एलईडी लाईट , मान्यवरांच्या स्वागतांचे बोर्ड व रंगरंगोटीसाठी सर्व ग्रामस्थ झटत आहेत !!!

“न भूतो, न भविष्यती “‘ , अशी जोरदार कार्यक्रमाची यशस्विता करण्यासाठी मुंबईपासून गावापर्यंत सर्व ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले आहे !!! सर्व ग्रामस्थ एकजुटीने कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडत आहेत !!!


शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी धामणंद तालुका खेड मधून पाषाणी मुर्त्यांचे , ढोल ताशांच्या गजरात ,गुळालाची उधळण करीत , फटाक्यांच्या आतिशबाजीत , भव्य रथातून मोठ्या दिमाखात , मुर्त्यांचे पोसरे गावी जंगी स्वागत होणार आहे !!!

त्याच दिवशी राक्षोघ्न होम व रात्री अकरा वाजता स्थानिक कार्यक्रम पार पडणार आहेत .
शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी मंदिराची शोडशोपचार पूजा , सायंकाळी ब्रम्हानंद भारती महाराज यांचे आगमन होणार असून , सायंकाळी सात ते नऊ आळंदीचे प्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य ह.भ .प. श्री बालाजी महादेव मेटे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे

. गायनाचार्य ह.भ.प.श्री भागवत महाराज रिंगणे यांचे गायन तर मृदंगमणी म्हणून ह .भ. प. श्री संदीप महाराज शिंदे व श्री विश्वास तामुंडकर यांची साथ लाभणार आहे !!


रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व ब्रह्मानंद भारती महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहन कार्यक्रम पार पडणार आहे

.नांदेडचे प्रसिद्ध शिल्पकार श्री अनिल चांदोजी ससाणे यांच्या कल्पक विचारातून ६१ फूट उंचीचे मागील हेमांडपंथी घुमट हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य असून ४१ फूट उंचीचे पुढील घुमट आहे !!!समोर आकर्षक प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेते !!!

धामणंद तालुका खेड मधील प्रसिद्ध पाषाणी मूर्तिकार श्री जगन्नाथ सुतार यांच्या कुशल कलेने मुर्त्यांची निर्मिती झाली असून पुरोहित म्हणून गोंधळे गावचे श्री भालचंद्र जोशी धार्मिक विधी करणार आहेत !!!


सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब , गृहराज्यमंत्री माननीय श्री योगेशदादा कदम , चिपळूण – गुहागरचे आमदार माननीय श्री भास्करशेठ जाधव , चिपळूण – संगमेश्वर चे आमदार माननीय श्री शेखरजी निकम , माजी आमदार माननीय श्री सदानंदजी चव्हाण साहेब , माननीय श्री विनयजी नातू साहेब ,जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री निलेशजी सांबरे साहेब , वाशिष्ठी दूध डेरीचे संस्थापक श्री प्रशांताजी यादव साहेब ,युवा उद्योजक श्री नासिर भाई खोत , तसेच तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी व निमंत्रित पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मित्र – परिवार , सगे – सोयरे ,माहेरवाशीण व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा नेत्रदीपक सोहळा संपन्न होणार आहे !!!


प्रथमच समस्त पोसरे माहेरवासिनींचे एकत्रित “हळदी- कुंकू “कार्यक्रम , मान्यवर पदाधिकारी , देणगीदारांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे .


रविवारी रात्री ठीक दहा वाजता – तुफान विनोदी लोकनाट्य , संगमेश्वरी शैलीतील चमचमीत – चटकदार चुटके ,गाणी आणि कोकणी कलांचे एकत्रित धुमशान, समर्थ कृपा प्रॉडक्शन रत्नागिरी निर्मित – “कोकणचा साज , संगमेश्वरी बाज !!!” हा मनोरंजनाचा कार्यक्रम हे या दिवशीचे खास आकर्षण आहे.


येणाऱ्या सर्व भाविकांना तीनही दिवशी चहा ,नाश्ता व भोजनाची व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे !!!

तरी तालुक्यातील तमाम भक्तांना व भाविकांना आवाहन करण्यात येते की , या तीनही दिवसांच्या कार्यक्रमांचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा ,अशी विनंती तसेचआवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे !!!

Previous Post

विश्रामबाग मधील अतिक्रमणे काढण्यात आली.

Next Post

बेस्ट उपक्रमात कार्यरत कर्मचारी, वेटलिज कर्मचारी, आणि निवृत्त कर्मचारी सभा यांची १७/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
5
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
बेस्ट उपक्रमात कार्यरत कर्मचारी, वेटलिज कर्मचारी, आणि निवृत्त कर्मचारी सभा यांची १७/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

बेस्ट उपक्रमात कार्यरत कर्मचारी, वेटलिज कर्मचारी, आणि निवृत्त कर्मचारी सभा यांची १७/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In