• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धडगाव वनविभागाची धडक कारवाई; बिलगावच्या दुर्गम भागातून ३० हजारांचा अवैध साग जप्त

by
February 17, 2026
in देश विदेश
0
धडगाव वनविभागाची धडक कारवाई; बिलगावच्या दुर्गम भागातून ३० हजारांचा अवैध साग जप्त
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी :

धडगाव वनविभाग यांनी धडगाव तालुक्यातील बिलगाव (प्रादेशिक) वनक्षेत्रात मोठी कारवाई करत सावऱ्या (कं.नं.७६) वनक्षेत्रातील अतिदुर्गम भागातून तस्करीच्या उद्देशाने लपवून ठेवलेला सुमारे २९ हजार ७२५ रुपये किमतीचा अवैध सागवान साठा जप्त केला आहे.

RelatedPosts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी भुषा परिमंडळातील बिलगाव (निलदयपाडा) शिवारात जंगल परिसरात सागवान दांड्यांचा साठा दडवून ठेवल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बिलगाव रेंज स्टाफने तातडीने गस्त व शोधमोहीम सुरू केली. सखोल तपासादरम्यान जंगलातील विविध ठिकाणी लपवून ठेवलेले ४४ नग साग दांडे (१.१४७ घनमीटर) व १ साग चौपट (०.०४२ घनमीटर) असा एकूण १.१८९ घनमीटर मुद्देमाल आढळून आला.

हा साठा ज्या ठिकाणी मिळाला तो भाग अत्यंत डोंगराळ व दुर्गम असून तेथे वाहनांची ये-जा पूर्णतः अशक्य होती. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी सुमारे २ ते ३ किलोमीटरची पायपीट करत जप्त केलेले सागवान लाकूड स्वतःच्या खांद्यावर (शिरओझे) वाहून मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर खाजगी वाहनाच्या साहाय्याने हा सर्व मुद्देमाल रात्री उशिरा धडगाव टिंबर डेपो येथे पावतीने जमा करण्यात आला.

या प्रकरणी वनपाल भरतसिंग परदेशी यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६(१) ड, ई, फ अन्वये वनगुन्हा क्रमांक ०१/२०२६ दाखल केला असून पुढील तपास स्वतः करत आहेत.

ही कारवाई धुळे वनवृत्त चे वनसंरक्षक निनु सोमराज, नंदुरबार वनविभाग चे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर तसेच सहाय्यक वनसंरक्षक एस. डी. साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत शेंडगे (बिलगाव), वनक्षेत्रपाल चारुशीला काटे (अक्राणी), प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल प्रथमेश ढाणे, वनपाल भरतसिंग परदेशी, प्रतिभा बोरसे, वनरक्षक मंगेश वळवी, अशोक पावरा, उमेश पावरा, पुनम पावरा, रेखा पावरा, मनिषा पावरा, जोली वळवी, प्रमिला पावरा, गिरधर पावरा, दिनेश वसावे, वैशाली पाडवी तसेच वनमजूर जाण्या पावरा यांनी मोलाची भूमिका बजावली.

वनविभागाच्या या धाडसी आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे जंगल संपत्तीची होणारी तस्करी रोखण्यात यश आले असून, अवैध वृक्षतोडीविरोधात विभागाची सतर्कता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Previous Post

दोघा भावांवर काळाचा घाला.. श्रीगोंदा तालुक्यातील दुर्दैवी घटना !

Next Post

एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुलची राज्यस्तरीय शासकीय स्पर्धेत घोडदौड सुरुच

Related Posts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
9
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
3
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post
एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुलची राज्यस्तरीय शासकीय स्पर्धेत घोडदौड सुरुच

एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुलची राज्यस्तरीय शासकीय स्पर्धेत घोडदौड सुरुच

ताज्या बातम्या

अकलूजमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली उत्साहात

अकलूजमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली उत्साहात

April 6, 2026
गोगाव येथे श्री कल्लेश्वर महाराज यात्रेला आजपासून प्रारंभ; विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

गोगाव येथे श्री कल्लेश्वर महाराज यात्रेला आजपासून प्रारंभ; विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

April 6, 2026
‘चलो मढी’चा नारा; राज्यस्तरीय अधिवेशनातून शेतरस्ता चळवळीला नवे बळ

‘चलो मढी’चा नारा; राज्यस्तरीय अधिवेशनातून शेतरस्ता चळवळीला नवे बळ

April 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In