सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या ९ जागांसाठी तब्बल ५०० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेनंतर त्यापैकी केवळ २० अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती रोहिणी तडवळकर यांनी दिली.
उमेदवारांची अंतिम निवड लवकरच जाहीर करण्यात येणार असून पात्रता, सामाजिक योगदान आणि पक्षनिष्ठा या निकषांवर निवड प्रक्रिया पार पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

