• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान युवा मंडळ बाईतवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शन मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले.

by
February 20, 2026
in Blog
0
0
SHARES
163
VIEWS

RelatedPosts

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

दिघोळमधील जीर्ण वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

वडाळी परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार; ओढ्याला पूर, वडाळी–श्रीगोंदा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Ad 1

नेहरूनगर, बाईतवाडी (प्रतिनिधी):
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान युवा मंडळ बाईतवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त श्री सुरेश जी पवार महाड यांच्याकडील शिवकालीन शस्त्र प्रदर्शन मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री संतोष कडव ,चंद्रकांत बाईत , सुरेश बाईत ,वसंत सावंत परशुराम बाईत ,प्रकाश बाईत प्रमोद बाईत ,मारुती बाईत, संजय लोटणकर तसेच गावचे पोलीस पाटील सौ रंजना खैर आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्री जगन्नाथ धनावडे यांच्यासह गावचे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून युवक-युवती, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मान्यवर श्री महेश जी मोरे , सौ शितलताई मोरे, सुदेश जाधव प्रकाश दाभेकर यांनी शिवरायांच्या शौर्य, धैर्य आणि लोककल्याणकारी कारभाराची आठवण करून दिली. “इतिहास हा केवळ वाचण्याचा विषय नसून तो आचरणात आणण्याची प्रेरणा देणारा आहे,” असे प्रतिपादन प्रमुख वक्त्यांनी केले.
प्रदर्शनामध्ये शिवकालीन तलवारी, ढाली, भाले, कट्यारी तसेच विविध युद्धसामग्रीचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले होते. प्रत्येक शस्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी व उपयोग याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे उपस्थितांना शिवकालीन युद्धनीती आणि पराक्रमाची जाणीव प्रत्यक्ष अनुभवता आली.
कार्यक्रमादरम्यान पोवाडे, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण तसेच शिवचरित्रावर आधारित थोडक्यात व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले. पोवाड्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने वातावरण शिवमय झाले. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी व आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता.
या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे तरुण पिढीमध्ये इतिहासाविषयी अभिमान व जागरूकता निर्माण करणे हा होता. आयोजकांनी सांगितले की, “शिवरायांचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी मंडळाचे आयोजक कुमार राकेश सावंत ,तुषार बाईत, सिताराम सावंत ,पंकज बाईत , प्रदीप बाईत, संतोष सानप, विनायक बाईत विलास बाईत ओमकार कडव चैतन्य बाईत , सतीश बाईत अविनाश बाईत, मयूर बाईत अनिकेत सावंत, आणि अमोल बाईत यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या सर्व आयोजकांचे अभिनंदन कौतुक सर्वांनी केले शेवटी सर्वांनी एकमुखाने “जय भवानी, जय शिवराय”चा घोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

टिटवाळा रिजन्सी संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साहपूर्ण उत्सव साजरा…

Next Post

बेकायदेशी गांजा वाहतूक करणाऱ्या तरुणाला थाळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात. कारवाईत १० किलो गांजा जप्त.

Related Posts

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
Blog

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

June 9, 2026
34
Blog

दिघोळमधील जीर्ण वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

June 9, 2026
114
वडाळी परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार; ओढ्याला पूर, वडाळी–श्रीगोंदा मार्गावरील वाहतूक विस्कळीत
Blog

वडाळी परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार; ओढ्याला पूर, वडाळी–श्रीगोंदा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

June 9, 2026
14
आलेगाव-सावरगाव परिसरासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; निलेश कापकर यांच्या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
Blog

आलेगाव-सावरगाव परिसरासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; निलेश कापकर यांच्या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

June 9, 2026
31
सावरगाव तांडा वस्तीतील विद्युत दाबाची समस्या अखेर मार्गी; निलेश कापकर यांच्या पाठपुराव्याला यश
Blog

सावरगाव तांडा वस्तीतील विद्युत दाबाची समस्या अखेर मार्गी; निलेश कापकर यांच्या पाठपुराव्याला यश

June 9, 2026
107
Blog

धर्मराव कृषी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन

June 9, 2026
10
Next Post
बेकायदेशी गांजा वाहतूक करणाऱ्या तरुणाला थाळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात. कारवाईत १० किलो गांजा जप्त.

बेकायदेशी गांजा वाहतूक करणाऱ्या तरुणाला थाळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात. कारवाईत १० किलो गांजा जप्त.

ताज्या बातम्या

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 9, 2026
डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

June 9, 2026

दिघोळमधील जीर्ण वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

June 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In