• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्रीचे रॅकेट उघड

by
February 21, 2026
in Blog
0
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

गरजु महिलांचा वापर, तीन महिलांना अटक

कल्याण : बदलापूर पूर्वेतील जोवेली परिसरात गरजू महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील स्त्री बीज (अंडी) वाढवून त्यांची बेकायदेशीर विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याविना बेकायदेशीर पद्धतीने सोनोग्राफी करून महिलांच्या गर्भाशयातील अंडी काढली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्सना सावंत यांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.

जोवेली भागातील नॅनो सिटी येथील एका इमारतीत सुलक्षणा गाडेकर यांच्या घरातून हे रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी बदलापूर पूर्व पोलिसांनी डॉ. ज्योत्सना सावंत यांच्या वैद्यकीय पथकासह संयुक्त धाड टाकली.

धाडीत आरोपीच्या घरातून स्त्री बीजांची वाढ करण्यासाठी वापरली जाणाऱ्या ( लसी ) इंजेक्शन सापडली. गाडेकर ही गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची सोनोग्राफी करून घेत असे. इंजेक्शन देऊन गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यानंतर त्या महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तेथे शस्त्रक्रिया विभागात अंडी काढून त्यांची विक्री केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रकरणी पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर (४४), व उल्हासनगर येथील अश्विनी चाबुकस्वार (२९) आणि मंजुषा वानखेडे (४६) या तिघींना अटक केली असून रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणात २० हून अधिक महिलांचा वापर झाल्याचा अंदाज असून त्यांना २५ ते ३० हजार रुपये दिले जात होते. अधिक आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

प्रतिनिधी: विनोद जगताप

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे दूरदृष्टी राजे होते- प्रल्हाद राजभोज….!

Next Post

रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकसतर्फे “गणिताची भीती दूर करूया.-संध्याताई जाधव.

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
46
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
50
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
31
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
75
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
14
Next Post

रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकसतर्फे “गणिताची भीती दूर करूया.-संध्याताई जाधव.

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In