• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दापोली : देव निघाले भक्तांच्या भेटीला; कळंबटमध्ये श्री देव धावजी शिमगोत्सवी पालखीचे वेळापत्रक जाहीर

by
February 22, 2026
in Blog
0
दापोली : देव निघाले भक्तांच्या भेटीला; कळंबटमध्ये श्री देव धावजी शिमगोत्सवी पालखीचे वेळापत्रक जाहीर
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

दापोली (प्रतिनिधी):

दापोली तालुक्यातील कळंबट येथे ग्रामदैवताच्या शिमगोत्सवी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून श्री देव धावजी देवस्थान ट्रस्ट तर्फे पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

RelatedPosts

संविधान मंदिराच्या स्थापनेने देशभक्ती वाढेल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

क्षत्रिय समाजाचा संताप उफाळला : समाजद्वेष पसरवणाऱ्या रवी पडवळविरोधात कठोर कारवाईची मागणी

दि. २२ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत पारंपरिक धार्मिक विधी, पालखी सोहळे, भजन-कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात मंदिरातील पारंपरिक होळी पूजनाने होणार असून त्यानंतर श्री देव धावजींची पालखी भक्तांच्या भेटीसाठी गावोगावी प्रस्थान करणार आहे.

ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात पालखीचे स्वागत करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी पूजा-अर्चा, आरती, नैवेद्य व हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. कळंबटसह आंबेड, जालगाव, शिरगाव, कोंढे, कर्डे, मुरूड, हर्णे, केळशी, आसूद, बोंडवली, करंजे आदी गावांमध्ये पालखीचे आगमन होणार आहे. ग्रामस्थांकडून स्वागत कमानी, सजावट व पारंपरिक रांगोळ्यांची तयारी सुरू असून युवक मंडळे आणि महिला मंडळेही उत्साहाने सहभागी होत आहेत.

कोकणातील शिमगोत्सव हा केवळ धार्मिक विधींचा कार्यक्रम नसून गावकी एकोप्याचा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव मानला जातो. या निमित्ताने संपूर्ण दापोली तालुका भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.

पांडुरंग महाजन यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्याने नियोजन करण्यात आले असून सुरळीत आयोजनासाठी विशेष समित्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व भाविकांनी जाहीर वेळापत्रकानुसार उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व पारंपरिक शिमगोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: प्रतिनिधी:राकेश.चिलबे.
Previous Post

बाबुर्डीत खळबळ: लक्ष्मी आई मंदिरातील पितळी मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला

Next Post

महाशिवरात्रीत शेळपवाडीत विज्ञानाचा उत्सव; आस्था गुरव हिने पटकावला प्रथम क्रमांक

Related Posts

Blog

संविधान मंदिराच्या स्थापनेने देशभक्ती वाढेल

June 16, 2026
0
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

June 16, 2026
0
Blog

क्षत्रिय समाजाचा संताप उफाळला : समाजद्वेष पसरवणाऱ्या रवी पडवळविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 16, 2026
4
Blog

अंबरनाथ येथील साऊथ इंडियन शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत

June 16, 2026
0
Blog

फुटपाथवर झाडांच्या फांद्यांचा ढिगारा; तेरणा महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

June 16, 2026
6
Blog

तेरणा महाविद्यालय, नेरूळ येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 16, 2026
10
Next Post
महाशिवरात्रीत शेळपवाडीत विज्ञानाचा उत्सव; आस्था गुरव हिने पटकावला प्रथम क्रमांक

महाशिवरात्रीत शेळपवाडीत विज्ञानाचा उत्सव; आस्था गुरव हिने पटकावला प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

संविधान मंदिराच्या स्थापनेने देशभक्ती वाढेल

June 16, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

June 16, 2026

क्षत्रिय समाजाचा संताप उफाळला : समाजद्वेष पसरवणाऱ्या रवी पडवळविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In