• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळच्या जेष्ठ अध्यापिका सौ.पद्मावती घाट यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित….

by
February 22, 2026
in देश विदेश
0
न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळच्या जेष्ठ अध्यापिका सौ.पद्मावती घाट यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित….
0
SHARES
96
VIEWS
Ad 1

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळच्या जेष्ठ अध्यापिका सौ.पद्मावती घाट यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित….

प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड:-न्यू. इंग्लिश स्कुल शेडशाळच्या शाळेतील जेष्ठ अध्यापिका सौ. पद्मावती घाट, यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करणेत आला. त्याच बरोबर या प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीच्या निमित्ताने मराठा मंडळ यांचेकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण व मान्यवरांच्या सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.

शिवजयंतीच्या निमित्ताने केंद्र स्तरावरील वक्तृत्व, निबंधाच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे व शील्ड देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. बक्षीस वितरणाच्या निमित्ताने श्री सुनील अंबुपे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिवजयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षी मराठा मंडळ शेडशाळ यांच्या वतीने गावातील शैक्षणिक, सामाजिक व शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला जातो.

यावर्षी सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार ग्रामपंचायत शेडशाळ यांना देण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या ज्येष्ठ अध्यापिका सौ.पद्मावती घाट मॅडम यांना देण्यात आला. शेती क्षेत्रातील पुरस्कार सेंद्रिय शेतीमध्ये योगदान देणारे सुनील कुचगावे यांना देण्यात आला.

यावेळी मराठा मंडळ शेडशाळचे सुनील सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या एकूण नियोजनामध्ये क्रीडाश्री अब्दुलकादर देसाई व श्री . संतोष माने यांचे योगदान फार मोलाचे होते. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत शेडशाळचे सरपंच सुनील संकपाळ व पदाधिकारी, मराठा मंडळ शेडशाळचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे मॅडम, सुनील कुचगावे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.

सूत्रसंचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री रियाज जमादार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.मनोज पासोबा सर यांनी केले.

Previous Post

जतमध्ये २७ फेब्रुवारीला ‘सकल हिंदू समाज’ भव्य संमेलन; काडसिद्धेश्वर स्वामीजींचे प्रबोधन

Next Post

पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथे एका बावीस वर्षीय तरुणाचा संशयस्पद मृत्यू…

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
बाभुळगाव येथे २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह; मृत्यू संशयास्पद, तपास सुरू

पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथे एका बावीस वर्षीय तरुणाचा संशयस्पद मृत्यू...

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In