• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात शेतकऱ्यांचा संताप

by
February 24, 2026
in Blog
0
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात शेतकऱ्यांचा संताप
0
SHARES
65
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

“भूमी हिरावू देणार नाही, वेळ आली तर लढा उग्र होईल”**
आजरा :प्रतिनिधी
परभणी येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीदरम्यान शेतकरी महिला-पुरुषांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आजरा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, शक्तीपीठ प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
या आंदोलनात श्रमिक मुक्ती दलचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, शेतकरी संघटनाचे अध्यक्ष तानाजी देसाई, काँग्रेसचे संजयभाऊ सावंत यांच्यासह संजय तर्डेकर, प्रकाश मोरुस्कर, कॉ. शांताराम पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, “माती ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही तर आईसमान आहे. तिच्यावर हात टाकाल तर शेतकरी शांत बसणार नाही. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश देणाऱ्या राजाच्या जयंतीनंतर लगेचच शेतकरी स्त्री-पुरुषांवर लाठीचार्ज होणे हे महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारे आहे.”
शेतकरी संघटनेचे नेते तानाजी देसाई म्हणाले, “शिवजयंतीच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांवर अन्याय करणारे सरकार कोणत्या विचारधारेचे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शेतकरी नव्हे तर भांडवलदारांचे हित जपण्यासाठीच शक्तीपीठ लादले जात आहे.”
आंदोलनाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी “वेळ आली तर रक्त सांडू, पण शेतकऱ्यांना भूमिहीन होऊ देणार नाही” असा एकच सूर आंदोलकांमध्ये दिसून आला.
यावेळी रवी भाटले, काशिनाथ मोरे, दशरथ घुरे, भीमराव माधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

जिल्हास्तरीय विज्ञान वारी आयोजित स्पर्धेतून सहलीसाठी ईश्वरी गणेश लाडाने हिची निवड

Next Post

व्यंकटराव येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पारंपारिक शेतीचे धडे

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
व्यंकटराव येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पारंपारिक शेतीचे धडे

व्यंकटराव येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पारंपारिक शेतीचे धडे

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In