• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध : जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांची ट्युशन एरिया भेटीदरम्यान वेणूताई गर्ल्स हॉस्टेलला भेट; ट्युशन परिसरातील अडचणी जाणून घेत दिले तात्काळ उपाययोजनेचे आदेश…

by
February 25, 2026
in Blog
0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध : जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांची ट्युशन एरिया भेटीदरम्यान वेणूताई गर्ल्स हॉस्टेलला भेट; ट्युशन परिसरातील अडचणी जाणून घेत दिले तात्काळ उपाययोजनेचे आदेश…
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

लातूर प्रतिनिधी – लातूर शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी ट्युशन एरिया भातीदरम्यान आज वेणूताई गर्ल्स हॉस्टेल येथे सदिच्छा भेट देत विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. विद्यार्थिनींच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले.

लातूर शहर हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असून राज्याच्या विविध भागांतून तसेच बाहेरगावाहून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी येत असतात. शिक्षणासोबतच सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असल्याची जाणीव ठेवून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी ट्युशन एरिया भेटीदरम्यान वेणूताई गर्ल्स हॉस्टेल येथे थेट भेट देत तेथील विद्यार्थिनींशी संवाद साधला.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

या भेटीदरम्यान विद्यार्थिनींनी ट्युशन क्लासला जाताना व परतताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. काही ठिकाणी अंधार, वाहतुकीची अडचण, संशयास्पद व्यक्तींची उपस्थिती किंवा सुरक्षिततेबाबत निर्माण होणारी चिंता यासंदर्भात विद्यार्थिनींनी आपली मते व्यक्त केली. पोलीस अधीक्षकांनी सर्व बाबी अत्यंत लक्षपूर्वक ऐकून आणि समजून घेतल्या.यावेळी त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना ट्युशन परिसरात नियमित गस्त वाढविणे, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवणे, विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे याबाबत सूचना दिल्या.

तसेच कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास तात्काळ पोलीसांना कळविण्याचे आवाहन विद्यार्थिनींना करण्यात आले. संवादादरम्यान पोलीस अधीक्षकांनी विद्यार्थिनींशी दिलखुलास चर्चा करत त्यांना त्यांचे उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारच्या भीती किंवा दबावाखाली न राहता आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे, पोलीस प्रशासन कायम तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

ट्युशन परिसर भेटीदरम्यान वेणूताई गर्ल्स हॉस्टेल येथे झालेल्या या भेटीमुळे विद्यार्थिनींमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाल्याचे पाहावयास मिळाले. अनेक विद्यार्थिनींनी पोलीस अधीक्षकांनी स्वतः हॉस्टेलमध्ये येऊन संवाद साधल्याबद्दल समाधान व्यक्त केले.लातूर जिल्हा पोलीस दल हे महिला सुरक्षा व विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत तत्पर असून भविष्यातही अशा प्रकारचे लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Previous Post

परभणी शहरात रामदास आठवले यांचे जाहीर स्वागत

Next Post

के. के. एम. महाविद्यालयाच्या गुणवंत खेळाडू व प्रशिक्षकांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post
के. के. एम. महाविद्यालयाच्या गुणवंत खेळाडू व प्रशिक्षकांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार

के. के. एम. महाविद्यालयाच्या गुणवंत खेळाडू व प्रशिक्षकांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In