परभणी प्रतिनिधी : रमेश मुलगीर
आज दि 25 फेब्रुवारी 2026 रोजी परभणी शहरात पाथरी रोड विसावा कॉर्नर येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले ना.मा.रामदासजी आठवले यांचे स्वागत करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.)च्या वतीने परभणी शहरात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. ना. रामदासजी आठवले यांचे जाहीर स्वागत करण्यात आले. शहरातील आयोजित कार्यक्रमस्थळी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर रामदास आठवले यांचे मोठे फलक लावण्यात आले होते. “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.)” तसेच “मा. ना. रामदासजी आठवले साहेबांचे हार्दिक स्वागत” अशा आशयाचे फलक लावून स्वागताची तयारी करण्यात आली होती.
यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. परभणी शहरातील सामाजिक व राजकीय घडामोडींवर चर्चा करत पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.








