• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उपोषणकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे- माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची आक्रमक भूमिका

by
February 28, 2026
in Blog
0
0
SHARES
40
VIEWS
Ad 1
Ad 1

नितेश गट्टीवार (गडचिरोली)दि.२८फेब्रुवारी: देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींनी दि. 23 फेब्रुवारी पासून विविध रास्त मागण्यांसाठी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. स्थानिक प्रशासन व संबंधितांवर गंभीर आरोप करत न्याय मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या उपोषण मंडपास माजी आमदार तथा आदिवासी मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी देवा भाऊ यांच्या लाडक्या बहिणीने सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भेट देत उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचा आढावा घेत संबंधित प्रश्नांवर नियमानुसार व कायदेशीर मार्गाने लढा देण्याची तयारी दर्शविली.उपोषण मंडपात भेटीदरम्यान डॉ. होळी यांनी आंदोलकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. संबंधित प्रकरणात अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “कोणाच्याही दबावाला बळी न पडता न्यायासाठी संघर्ष करू. मागण्या रास्त असतील तर त्या मान्य झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.तसेच, आंदोलन संविधानिक चौकटीत राहून आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे पुढे नेले जाईल, असे स्पष्ट करत त्यांनी उपोषणकर्त्यांना धीर दिला.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

अन्याय करणाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.डॉ. होळी यांच्या भेटीमुळे उपोषणकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पुढील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली चामोर्शी येथील गरीब शेतकरी व शेतमजूर महिलांना बँकेशी संलग्न करून त्यांच्या नावाने कर्ज उचलून फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या नगरसेवक आशिष अरुण पिपरे व नगरसेविका सोनाली आशिष पिपरे यांना तात्काळ अटक करावी.फसवणुकीसाठी स्थापन करण्यात आल्याचा आरोप असलेल्या शिवम इंडस्ट्रीज व आर. एन. ट्रेडिंग कंपनी यांची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी.आशिष पिपरे यांनी जमा केलेल्या संपूर्ण मालमत्तेची एसआयटीमार्फत चौकशी करावी.ट्रॅक्टर खरेदी-विक्री प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या आशिष अरुण पिपरे, सोनाली आशिष पिपरे व अरुण लहुजी पिपरे यांना तात्काळ अटक करावी.चिचडोह बॅरेज पाण्याखाली गेलेल्या जमीन रजिस्ट्री प्रकरणातील संबंधित महिलेला तात्काळ न्याय द्यावा. आदी मागण्यांचा यात समावेश आहे. यावेळी माजी आमदार डॉ. होळी यांनी उपोषण कर्त्यांसमोर गडचिरोली चे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सोबत फोन वर चर्चा केली असता पोलीस अधीक्षकांनी तात्काळ गडचिरोली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, चामोर्शी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दीपक डोम ह्यांना उपोषण स्थळी जाऊन माजी आमदार डॉ. होळी व उपोषण कर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पाठविले. यावेळी माजी आमदार डॉ. होळी दोन्ही पोलीस निरीक्षक व उपोषण कर्त्यांना मध्ये मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

Ad 1
Previous Post

ग्रामीण विकास विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Next Post

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना डॉक्टरेट पदवी बहाल..

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
15
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना डॉक्टरेट पदवी बहाल..

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In