• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ठाणे-विरार बुलेट ट्रेन स्थानके होणार स्मार्ट

by
March 1, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक परिसर स्टेशन एरिया डेव्हल्पमेन्ट अलाँग द मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल काॅरिडोअर (स्मार्ट) अंतर्गत विकास करण्यात येणार आहे.

यासाठी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था (जायका) यांच्या मदतीने यासाठी एमएमआरडीएकडून विकास आराखडा तयार केला जाणार आहे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत स्थानक परिसरात प्रवाशांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

मुंबई-अहमदाबाद अंतर केवळ दोन ते अडीच तासात पार करता यावे यासाठी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे.

अंदाजे ५०८ किमीच्या या मार्गात एकूण १२ स्थानकांचा समावेश आहे. यातील चार बुलेट ट्रेन स्थानके महाराष्ट्रात आहे. बीकेसी, ठाणे, विरार आणि पालघर अशी ही चार स्थानके आहेत.

बुलेट ट्रेन कार्यान्वित झाल्यानंतर स्थानक परिसरात प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यानुसार आता बुलेट ट्रेन स्थानक परिसराच्या एकात्मिक विकासासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. ठाणे आणि विरार या दोन स्थानक परिसराचा पहिल्या टप्प्यात विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बीकेसी आणि पालघर स्थानक परिसराचाही ठाणे-विरार स्थानकांच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक परिसराचा विकास कसा साधायचा हे ठरविण्यासाठी नुकतीच एमएमआरडीएच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील कार्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या आणि जायकाच्या अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञांनी या कार्यशाळेस हजेरी लावली.

यावेळी जायका आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मदतीने स्थानक परिसर विकासासाठी विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच हा आराखडा तयार करून स्थानक परिसराचा विकास मार्गी लावला जाणार आहे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत ठाणे आणि विरार स्थानक परिसरात वाहनतळ, रिक्षा, टॅक्सी स्टॅन्ड, बस थांबा यासह अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Previous Post

कोकणासाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय : M2M रो-रो सेवा मुंबईहून विजयदुर्गकडे रवाना

Next Post

📰 उद्घाटन वालुजमध्ये ‘अयोध्या दूध डेयरी’चा भव्य शुभारंभ – स्थानिकांसाठी शुद्ध दूधाचा नवा विश्वास!🟥🟥🟥📍

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

📰 उद्घाटन वालुजमध्ये ‘अयोध्या दूध डेयरी’चा भव्य शुभारंभ – स्थानिकांसाठी शुद्ध दूधाचा नवा विश्वास!🟥🟥🟥📍

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In