• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हुडको कॉलनीतील नियमबाह्य गतिरोधकांविरोधात नागरिकांचे निवेदन; शिरुर नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी

by
March 2, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

शिरुर (प्रतिनिधी) – शिरुर शहरातील हुडको काॅलनी येथील तीन गतिरोधकांवर नियमांनुसार परावर्तित रंगकाम व सूचना फलक नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून आज स्थानिक नागरिकांनी शिरुर नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

कॉलनीतील सनराईज कटिंग दुकानाजवळ, सुखकर्ता किराणा दुकानाजवळ आणि आदित्य सुपर मार्केटजवळ हे तीन गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी आवश्यक काळे-पांढरे अथवा काळे-पिवळे परावर्तित पट्टे नसून “Speed Breaker Ahead” असा कोणताही सूचना फलक लावण्यात आलेला नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना हे गतिरोधक स्पष्टपणे दिसत नसल्याने अचानक ब्रेक लावावे लागतात व अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास आदित्य सुपर मार्केटजवळील गतिरोधकावरून जात असताना एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. संबंधित व्यक्ती किरकोळ जखमी झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, गतिरोधक बसविताना शासनाच्या नियमांनुसार उंची-रुंदीचे मापदंड, परावर्तित रंगकाम आणि पूर्वसूचना फलक लावणे बंधनकारक असते. मात्र येथे या नियमांचे पालन झालेले दिसत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आज दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत —

1 तिन्ही ठिकाणी तात्काळ परावर्तित रंगकामकरणे. 2.प्रत्येक गतिरोधकापूर्वी आवश्यक सूचना फलक लावणे. 3.गतिरोधकांचे मापदंड नियमांनुसार तपासणे. 4.संबंधित ठेकेदारास लेखी सूचना देऊन दुरुस्तीचे आदेश देणे. 5.झालेल्या हलगर्जीपणाबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करणे. 6.२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघाताची अधिकृत नोंद घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे.

    नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणी शिरुर नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

    Previous Post

    रिसोडचे चार पर्यटक दुबईत अडकले कुटुंबीयांची चिंता वाढली

    Next Post

    ​अयातुल्ला अली खामेनाई यांच्या निधनानंतर परळीत तीव्र पडसाद; अमेरिका-इस्रायलचा निषेध करत शहरातून काढली रॅली

    Related Posts

    गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    Blog

    गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    September 23, 2026
    2
    Blog

    मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

    September 23, 2026
    4
    मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
    Blog

    मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

    September 23, 2026
    0
    दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
    Blog

    दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

    September 23, 2026
    1
    हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
    Blog

    हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

    September 23, 2026
    0
    राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
    Blog

    राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

    September 23, 2026
    0
    Next Post

    ​अयातुल्ला अली खामेनाई यांच्या निधनानंतर परळीत तीव्र पडसाद; अमेरिका-इस्रायलचा निषेध करत शहरातून काढली रॅली

    ताज्या बातम्या

    गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    September 23, 2026

    मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

    September 23, 2026
    मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

    मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

    September 23, 2026

    Popular Stories

    • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

      स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

      0 shares
      Share 0 Tweet 0
    सारथी महाराष्ट्राचा न्यूज

    © 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

    Navigate Site

    • शिक्षण
    • सरकारी योजना

    Follow Us

    No Result
    View All Result
    • शिक्षण
    • सरकारी योजना
    • Login

    © 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In