• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुवर्णयुगचा राजा महिला मित्र मंडळ, हुडको कॉलनी – वाईट प्रवृत्तींच्या दहनातून सामाजिक संदेश

by
March 2, 2026
in Blog
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1
Ad 1

शिरुर (प्रतिनिधी) – शिरुर शहरातील हुडको वसाहतीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही “सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळा”च्या वतीने होळीचा सण आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पारंपरिक उत्साहाबरोबरच समाजप्रबोधनाचा ध्यास घेत या उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

होळी म्हणजे केवळ रंगांचा आणि आनंदाचा सण नसून, वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा सण आहे. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद यांच्या भक्तीसमोर होलिका हिचा अहंकार जळून खाक झाला. त्याच परंपरेला अनुसरून मंडळाने यंदा “मानवी वाईट प्रवृत्तींचे प्रतीकात्मक दहन” हा उपक्रम राबवला.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

मंडळाच्या वतीने एका पुट्ठ्याच्या झाडावर विविध वाईट प्रवृत्तींची नावे लिहिलेली शब्दकार्ड लावण्यात आली. होळीच्या पवित्र अग्नीत खालील प्रवृत्तींचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले –

🔥 होळी दहनासाठी वाईट प्रवृत्ती –
भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, स्त्रीद्वेष, जातीयवाद, स्वार्थीपणा, हिंसक प्रवृत्ती, अहंकार, फसवणूक, खोटेपणा, जळकेपणा.

या उपक्रमातून समाजातील प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून आपल्या मनातील नकारात्मक विचार आणि वाईट सवयी जाळून टाकण्याचा संदेश देण्यात आला.

या सर्व उपक्रमाचे नियोजन मंडळाच्या महिला अध्यक्षा सौ. दिपाली चौधरी यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळातील सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विधिवत पूजन करून होळी प्रज्वलित करण्यात आली आणि एकोप्याने, भक्तिभावाने सण साजरा करण्यात आला. परिसरातील लहानग्या चिमुकल्यांचीही मोठी उपस्थिती होती.

महिलांच्या पुढाकारामुळे हा सण केवळ उत्सव न राहता समाजप्रबोधनाचा एक सुंदर मंच ठरला. उपस्थितांनी या अभिनव कल्पनेचे कौतुक केले व अशा सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमांचे दरवर्षी आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

वाईट प्रवृत्तींच्या दहनातून चांगल्या विचारांची ज्योत पेटवण्याचा संदेश देत “सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळा”ची ही होळी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरली. 🔥

Ad 1
Previous Post

माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांचा शोकसंदेश

Next Post

मा. आमदार, डॉ.श्री. राजेंद्र पाटील – यड्रावकरसो यांना कुरुंदवाड शहर अतिक्रमणधारक संघर्ष समिती कडून निवेदन दिले….

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
43
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
मा. आमदार, डॉ.श्री. राजेंद्र पाटील – यड्रावकरसो यांना कुरुंदवाड शहर अतिक्रमणधारक संघर्ष समिती कडून निवेदन दिले….

मा. आमदार, डॉ.श्री. राजेंद्र पाटील - यड्रावकरसो यांना कुरुंदवाड शहर अतिक्रमणधारक संघर्ष समिती कडून निवेदन दिले....

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In