• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

by
March 2, 2026
in Blog
0
बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
0
SHARES
53
VIEWS
Ad 1
Ad 1

लातूर प्रतिनिधी –

लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलामार्फत सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून लातूर शहरात अवैध धंदे व संशयित इसमांवर कारवाई करण्यासाठी विशेष गस्त व तपास मोहीम सुरू आहे.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना रात्री सुमारे २३.१५ वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, शाहू कॉलेज जवळील महानगरपालिका पार्किंग परिसरात रोहित कतारी नावाचा इसम संशयास्पदरीत्या बसलेला असून त्याच्याकडे धारदार शस्त्र आहे.सदर माहितीची खातरजमा करून रात्री २३.३० वाजता शाहू कॉलेज जवळील महानगरपालिका पार्किंग येथे पोलीस पथक पोहोचले असता तेथे एक तरुण बसलेला आढळून आला.

त्यास ताब्यात घेऊन नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव रोहित शेरसिंग कतारी (वय १८ वर्षे, रा. वीर हनुमंतवाडी, लातूर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेण्यात आली असता त्याच्या कमरेला एक लोखंडी कोयता आढळून आला. सदर शस्त्र बेकायदेशीररीत्या बाळगलेले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर कोयता ताब्यात जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी आरोपी रोहित शेरसिंग कतारी याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोउपनि राजेश घाडगे, पोउपनि अमर केंद्रे, सफौ सर्जेराव जगताप, संजय कांबळे, रियाज सौदागर, प्रशांत स्वामी, व्यंकटेश निटूरे, चंद्रकांत केंद्रे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय लातूर शहर येथील महेश पारडे व गणेश मोरे यांनी पार पाडली.

लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

मा. आमदार, डॉ.श्री. राजेंद्र पाटील – यड्रावकरसो यांना कुरुंदवाड शहर अतिक्रमणधारक संघर्ष समिती कडून निवेदन दिले….

Next Post

नरडवे (पवारवाडी) येथे रखडलेल्या विकासकामांना सुरुवात

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
13
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
6
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
1
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
2
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
23
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post
नरडवे (पवारवाडी) येथे रखडलेल्या विकासकामांना सुरुवात

नरडवे (पवारवाडी) येथे रखडलेल्या विकासकामांना सुरुवात

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In