• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी आल्याने जलपर्णीचा विळखा….

by
March 3, 2026
in देश विदेश
0
पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी आल्याने जलपर्णीचा विळखा….
0
SHARES
39
VIEWS
Ad 1

पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी आल्याने जलपर्णीचा विळखा…..

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :- पंचगंगा नदीपात्रात पुन्हा रसायनयुक्त सांडपाणी आल्याने नदी प्रदूषित झाली आहे.पाण्याला फेस येत आहे.पाण्याचा रंग बदलला आहे.नदी काठावर दुर्गंधी सुटली असून शेतीला पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे.तर जलपर्णीने पंचगंगा नदीचा परिसर व्यापला आहे. तिला हिरवेगार मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे पंचगंगेचे हे स्वरूप कधी बदलणार असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

पंचगंगा नदीत रसायनयुक्त पाणी आले आहे. त्यावर जलपर्णीने विळखा घातला आहे. पाण्याला औद्योगिक वसाहतीतील प्रोसेसच्या रासायनिक पाण्यासारखा काळपट-हिरवट रंग येत असून पाण्याला फेस येत आहे.

अब्दुललाट, शिरढोण, हेरवाड, तेरवाड, नांदणी, धरणगुत्ती, हरोली, शिरोळ या गावच्या पाणी योजना पंचगंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. प्रदूषित पाणी आल्याने या गावच्या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच परिसरातील हजारो एकर आधारित शेती क्षारपड होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. प्रत्येक वर्षी नदीकाठच्या ग्रामस्थांना प्रदूषित पाण्याचा सामना करावा लागतो. तर वारंवार नदीचे प्रदूषण हे सुरूच आहे.

प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, प्रदूषण नियंत्रण मंडळाबद्दल नाराजीचा सुर उमटत आहे.राज्य सरकारने याबाबत कठोर भूमिका घेतली मात्र राज्य सरकारचा आदेश धाब्यावर बसवित प्रदूषित घटकांनी प्रदूषणाची सीमा ओलांडली आहे.तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने झोपेचे सोंग घेतल्याने न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.   

प्रदूषण प्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळाशी अनेकवेळा चर्चा करूनही शिरोळ तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून कोणतीच उपाय योजना त्यांनी राबवलेली नाही.प्रशासनने याबाबत ठोस उपाय योजना राबवून प्रदूषित घटकांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी केली आहे.

Previous Post

बाभुळगाव येथे नविन सब स्टेशनचे उद्घाटन माढा मतदार संघाचेआमदार अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले……!!

Next Post

ऑटो अपघातात एकाचा मृत्यु;अनेक जखमी!

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
ऑटो अपघातात एकाचा मृत्यु;अनेक जखमी!

ऑटो अपघातात एकाचा मृत्यु;अनेक जखमी!

ताज्या बातम्या

अंबिका विद्यालयाचा बारावीचा उज्वल निकाल; शंभर टक्क्यांची परंपरा कायम

अंबिका विद्यालयाचा बारावीचा उज्वल निकाल; शंभर टक्क्यांची परंपरा कायम

May 5, 2026
गुहागर किनाऱ्यावर कचऱ्याचा विळखा; पर्यटकांच्या निष्काळजीपणावर स्थानिक संताप

गुहागर किनाऱ्यावर कचऱ्याचा विळखा; पर्यटकांच्या निष्काळजीपणावर स्थानिक संताप

May 5, 2026
अमृत 2.0 मोहिमेतून पाणी संवर्धनाचा संदेश; बार्शी टाकलीत जनजागृती कार्यक्रम उत्साहात

अमृत 2.0 मोहिमेतून पाणी संवर्धनाचा संदेश; बार्शी टाकलीत जनजागृती कार्यक्रम उत्साहात

May 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In